आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दृश्यम सारखी घटना:चिटफंड कंपनीचे CEO यांचा मृतदेह एकीकडे तर फोनचे लोकेशन मिळत होते दुसरीकडून; 7 आरोपी अटकेत

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्य सूत्रधार पहिले चिटफंड कंपनीत काम करायचा

पिंपरी चिंचवड पोलिसांनी आनंद चिटफंड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद उनवणे यांच्या हत्येचा आणि अपहरणाचा गुंता सोडवल्याचा दावा केला आहे. आनंद यांचे 4 फेब्रुवारी रोजी अपहरण करण्यात आले होते आणि त्याचा मृतदेह 6 फेब्रुवारीला सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी हरियाणा व इतरत्र 7 आरोपींना अटक केली आहे, मात्र मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. त्यांच्याकडून 39 लाख 5 हजार 678 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

अपहरण आणि खुनाची घटना 'दृश्यम' चित्रपटासारखी असल्याचे पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी सांगितले. अपहरणानंतर मृत व्यक्तीच्या मोबाइलवरुन पैशांची मागणी करण्यात आली. आनंद यांचा मृतदेह एकीकडे सापडला आणि मोबाईलचे लोकेशन दुसरीकडेच दिसत होते. असे म्हटले जात आहे की, मुख्य सूत्रधार हा फोन वापरत होता. सध्या फोन जप्त करण्यात आलेला नाही. या प्रकरणात मंगळवारी दीपक धरमवीर चंडालिया, सागर दत्तात्रय पतंगे, तुलसीराम ऊर्फ बाबू नाथूराम पोकळे, उमेश सुधीर मोरे, प्रविंद नवनाथ सोनवणे, राकेश राजकुमार हेमानी आणि कपिल ज्ञानचंद हासवानी यांना मंगळवारी अटक केली आहे.

मुख्य सूत्रधार पहिले सोबत काम करायचा
या प्रकरणात फरार असलेला प्रभु पुजारी यापूर्वी आनंद उनवणे यांच्या चिटफंड कंपनीत काम करायचा, पण त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. याचा बदला घेण्यासाठी प्रभू पुजारी यांनी या संपूर्ण हत्येचा कट रचला होता.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
4 फेब्रुवारी रोजी व्यापारी आनंद उनवणे यांचे अपहरण झाले आणि त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत 6 फेब्रुवारीला महाडमधील महाड-पंढरपूर रोडवर सावित्री नदीच्या काठावर आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरणकर्त्याने त्यांच्या फोनवरून 60 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. कुटुंबीयांनी पैसे दिल्यानंतरही आनंद यांची हत्या करण्यात आली. मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी त्याला दगडाने ठेचले होते.

2000 CCTV तपासले

कृष्णा प्रकाश म्हणाले की, आनंद यांचा मृतदेह जिथे सापडला तेथे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता, त्यानंतर पिंपरी चिंचवड ते महाड या मार्गावर 2000 कॅमेरे तपासण्यात आले. याच तपासणीत आनंद काही लोकांसह कारमध्ये बसलेले दिसले आणि एका आरोपीची ओळख पटली.

2 महिलांवरही संशय आहे
पोलिस आयुक्त म्हणाले की व्यापारी आनंद उनवणे यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता आणि ते दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते. आनंद यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या दोन्ही महिलांकडे अनेकदा चौकशी केली, परंतु कोणताही पुरावा मिळाला नाही. यानंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...