आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आयसीएआय-एमएसएमई यात्रा':19 ऑगस्टला पुणे शहरात आयोजन; उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा उपक्रम

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी 'आझादी का अमृतमहोत्सव' च्या औचित्याने दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे 'आयसीएआय एमएसएमई सेतू' आणि 'आयसीएआय एमएसएमई यात्रा' यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. याअंतर्गत 75 दिवस 75 शहरात 75 कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ही 'आयसीएआय एमएसएमई यात्रा' शुक्रवारी (19 ऑगस्ट) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दाखल होत आहे.

'आयसीएआय'च्या पुणे व पिंपरी शाखेच्या वतीने व 'एमसीसीआयए' च्या सहकार्याने या यात्रेचे स्वागत केले जाणार असून, पदाधिकाऱ्यांकडून या रथयात्रेचे समन्वयन केले जात आहे. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देणाऱ्या विविध प्रयत्नांचे प्रदर्शन असलेला रथ शहरात फिरणार आहे. यानिमित्ताने 'एमसीसीआयए', भोसरी ब्रांच, जे-462, टेल्को रोड, क्वालिटी सर्कलसमोर, गणेशनगर, भोसरी, पुणे येथे कार्यक्रम घेणार आहे. अशी माहिती 'आयसीएआय'च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए. चंद्रशेखर चितळे यांनी मंगळवारी दिली.

उद्योजकतेला चालना देण्यासाठी कार्यक्रम

चंद्रशेखर चितळे म्हणाले, विविध भागधारक आणि एमएसएमई यांच्यातील दुवा म्हणून सनदी लेखापाल (सीए) महत्वाची भूमीका बजावत आहेत. 'एमएसएमई'च्या गरजांना तात्काळ प्रतिसाद देणारा घटक म्हणून सीए काम करतो. 'आयसीएआय एमएसएमई सेतू' आणि 'आयसीएआय एमएसएमई यात्रा' यामधून 'एमएसएमई' ला प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमात 'एमएसएमई क्लिनिक' चे आयोजन केले असून, त्यामध्ये भारत सरकारच्या 'एमएसएमई' मंत्रालयातील प्रतिनिधी, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे (सिडबी) प्रतिनिधी, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचे (एनएसआयसी) प्रतिनिधी, बँक अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी व सनदी लेखापाल मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय, दिवसभर मोफत उद्यम नोंदणी करून दिली जाणार आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शाखेतर्फे कार्यक्रम

'आयसीएआय'च्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शाखेच्या पुढाकारातून दिवसभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. विविध संस्था, प्रादेशिक विभाग, स्थानिक चेंबर्स, इंडस्ट्री असोसिएशन, एमएसएमई केंद्रे यांच्या प्रतिनिधींनी अधिकाधिक संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 'एमएसएमई'वर जागृतीपर कार्यक्रमात अर्थसहाय्य व अनुदान, इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, इन्सेन्टिव्ह, केंद्र सरकारच्या योजना, राज्याच्या योजना, सीएची भूमीका, आयात-निर्यात अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...