आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे मेट्रोमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किमी) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक ( १६ किमी) असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक (७ किमी). आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक (५ किमी) या मागांचे उदघाटन दिनांक ६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान यांचे हस्ते होऊन तो प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.
पुणे मेट्रोच्या उर्वरित मार्गिकेवर अत्यंत वेगाने काम सुरु असून लवकरच फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक, गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल ये मार्गिकची कामे लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन पुणे मेट्रोने केले आहे. या मार्गिकेची कामे मार्च २०२३ अखेर पूर्ण केली जातील. त्यानंतर रेल संरक्षा आयुक्त यांचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणांची पूर्तता केल्यानंतर हे तीन मार्ग प्रवाश्यांसाठी खुले करता येतील.
फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गावर दापोडी, बोपोडी आणि शिवाजीनगर या स्थानकांची कामे ९५ % पूर्ण झाली असून या मार्गांवर आधीच मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे. या मेट्रो मार्गिकमुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे हि दोन जुळी शहरे पेट जोडली जाणार आहेत. गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गिकेवर डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका या महत्त्वाच्या स्थानकांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.
या मार्गिकांमुळे पौड रस्ता येथील शहराचा भाग हा दिवाणी न्यायालय, जंगली महाराज रस्ता, गोपालकृष्ण गोखले रस्ता (एफ सी रस्ता), शिवाजीनगर, पुणे महानगरपालिका यांना थेट जोडला जाणार आहे. त्याचप्रमाणे या भागातील रहिवासी नागरिकांना सहजपणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व भोसरी या भागातील औद्योगिक पट्ट्यामध्ये प्रवास करण्यासाठी मेट्रो मार्गिका उपलब्ध होणार आहे.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल, मंगळवार पेठ (आर टी ओ), पुणे रेल्वे स्थानक येथील मेट्रो स्थानकांची कामे जवळपास पूर्ण झाली आहे. या मार्गिकमुळे पिंपरी चिंचवड आणि पौड रस्ता, कर्वे रस्ता येथील नागरिकांना थेट पुणे रेल्वे स्थानक, आर टी ओ, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलीस आयुक्तालय येथे जाणे सुलभ होणार आहे.
या नवीन मार्गिकांमुळे विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे. वाडिया महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, एम आय टी महाविद्यालय, मॉर्डन महाविद्यालय, बी एम सी सी महाविद्यालय, एम एम सी सी महाविद्यालय, आगरकर इन्स्टिटयूट, गोखले इन्स्टिटयूट, रानडे इन्स्टिटयूट, FTII, विधी महाविद्यालय अश्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक याठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गिकेतील भूमिगत स्थानक आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गिकतील उन्नत स्थानक आहे.भूमिगत स्थानकातून उन्नत स्थानकात तसेच उन्नत स्थानकातून भूमिगत स्थानकात जाण्यासाठी १० एस्किलेटर (सरकते जिने), ६ लिफ्ट (उद्वाहक)आणि प्रशस्त जिने यांनी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मार्गिका बदलणे अत्यंत सहजपणे करता येईल.
दिवाणी सत्र न्यायालय हे पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. न्यायालयाच्या कामासाठी येथे दिवसभरात ३० हजार ते ४० हजार नागरिक येत असतात. तसेच पुणे रेल्वे स्थानकात २४ तासात १ लाखहून अधिक नागरिक भेट देत असतात, यासर्वांना मेट्रो अतिशय उपयोग होणार आहे. या दोन्ही ठिकाणी लांबून येणान्या प्रवाश्यांचा मेट्रोमुळे प्रवास सुकर होणार आहे. तसेच त्याभागातील वाहतुक कोंडी आणि पार्कींगची समस्या सुटण्यासाठी मेट्रो उपयोगी पडेल.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे कि, फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक, गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गिकांमुळे पुण्यातील महत्वाची ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत. त्यानंतरच्या टप्प्यातील रुबी हॉल स्थानक ते रामवाडी स्थानक आणि सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गिकांची कामे प्रगतीपथावर असून हे मारदेखील लवकरच खुले करण्यात येथील
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.