आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:पुण्यात महाविद्यालयीन तरुणीस चाकुचा धाक दाखवत वारंवार अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला पोलिसांकडून अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका महाविद्यालयीन तरुणीला चाकुचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार करणाऱ्या एका आरोपीस कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती शनिवारी दिली आहे. सारंग संजय शिंदे (वय -20, रा. कोंढवा बुद्रुक,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत एका अल्पवयीन युवतीने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडीत युवती आणि आरोपी शिंदे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात काहीकाळ प्रेमसंबंध होते. शिंदेने युवतीला त्याच्या घरी नेले त्यानंतर त्याने चाकुचा धाक दाखवून त्याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तसेच त्याने मोबाइलवर युवतीची आक्षेपार्ह छायाचित्रे काढली. त्यानंतर त्याने धमकावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. शिंदेच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या युवतीने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. शिंदे याला अटक करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक एस चव्हाण याबाबत पुढील तपास करत आहेत.

महाविद्यालयीन तरुणीचा मोबाइल चोरणारा चोरटा गजाआड पुणे स्टेशन परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीचा मोबाइल फोन हिसकावणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडले आहे. याप्रकरणी चोरट्यास बंडगार्डन पाेलिसांनी अटक केली आहे.अर्जुन रामदास पवार (वय -२६, रा. श्री कालिका मंदिराजवळ, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

याप्रकरणी महाविद्यालयीन तरुणीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळाजवळून निघाली होती. त्या वेळी पवारने तिच्या हातातील मोबाइल फोन हिसकावून नेला. युवतीने आरडाओरडा केला. नागरिकांनी पसार झालेल्या पवारला पाठलाग करुन पकडले. पवारला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पवारने मोबाइल हिसकावण्याचे आणखी काही गुन्हे केले आहेत का ? या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.