आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइन्स्टाग्रमावर या साेशल मिडिया साईटवर ठराविकच स्टेटस ठेवल्याचे वादातून उरळीकांचन परिसरात 12 वी मध्ये शिकणाऱ्या दाेन गटात तुफान राडा झाला आहे. एकमेकांना लाकडी दांडके, हाॅकी स्टीक, लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जखमी करण्यात आल्याचे घटनेने हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात जाऊन आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लाेणीकाळभाेर पोलिस ठाण्यात 17 वर्षीय मुलाने आठ जणां विराेधात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती पोलिांनी बुधवारी दिली. त्यानुसार,प्रेम कांचन (वय-19), ऋषिकेश चांदगुडे (18), प्रथमेश कांचन(18), जयेश कांचन (18), चैतन्य महाडीक याच्यासह तीन 17 वर्षाच्या मुलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना 24 जानेवारी राेजी पद्यश्री मनिभाई देसाई ज्युनिअर काॅलेजच्या पार्किंग परिसर व ओढयाजवळ बाजारराेड, उरळीकांचन, पुणे येथे घडलेली आहे.
तक्रारदार मुलगा हा संबंधित महाविद्यालयात इयत्ता 12 वी मध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या वर्गातील एका मित्रास त्याने माेबाईल मध्ये इन्स्टाग्राम या साेशल मिडियावर ए.के. व के.के. असे स्टेटस का ठेवले अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने आराेपीने त्याचे इतर साथीदारां साेबत येवुन तक्रारदार मुलगा व त्याचे मित्रांना स्टीलची स्टीक, लाकडी दांडके व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जखमी करत शिवीगाळ केली.
स्टीलचे स्टीकने मारहाण केल्यास व्यक्ती जबर जखमी हाेऊ शकताे याची जाणीव असताना देखील सदर स्टीलचे स्टीकने मारहाण करुन जबर जखमी केल्याने याप्रकरणी आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आणखी एका 17 वर्षाच्या विद्यार्थ्यास आराेपी प्रेम कांचन व त्याच्या दाेन अल्पवयीन साथीदारांनी इन्सटाग्राम स्टेटसचे वादातून लाेखंडी राॅडने मारहाण करुन जखमी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास लाेणीकाळभाेर पोलिस करत आहे.
पत्ता विचारण्याचे बहाण्याने चाकूने हल्ला
वारजे ब्रीजखाली सार्वजनिक रस्त्यावर शुभम गाेरख निकाळजे (वय-24,रा.वारजे,पुणे) हा 21 जानेवारी राेजी थांबलेला हाेता. त्यावेळी सदर ठिकाणी आराेपी सुनिल क्षिरसागर (रा.कात्रज,पुणे) हा दारु पिवुन येवुन त्याने कात्रजला कसे जायचे अशी विचारणा केली. त्यामुळे शुभम याने त्यास येथुन रिक्षाने जातात , तुम्हाला जाता येईल का, साेडयला येऊ असे म्हणाला असता, आराेपीने त्यास ‘तु इथे कधीपासून काम करताे’ म्हणुन शिवीगाळ केली. त्यामुळे शुभमने त्यास शिव्या का देता असे विचारले असता, आराेपीने खिशातून बारीक चाकु काढून शुभमच्या चेहऱ्यावर व डाव्या हाताचे मनगटावर वार करुन त्यास जखमी केले आहे. याप्रकरणी पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.