आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी 21 वर्षांच्या दोन चोरांना अटक केली आहे. त्यांनी मौजमजेसाठी चोरीचे काम सुरू केले होते. हे दोघेही पुण्याच्या एका प्रतिष्ठित कॉलेजचे विद्यार्थी आहेत. पिंपरी चिंचवड क्राइम ब्रांच युनिट-3 ने यांच्याजवळून 12 बुलेट आणि 3 बाइक्स ताब्यात घेतल्या आहेत. पोलिस यांच्यासोबतच्या अजुन एका व्यक्तीच्या शोधात आहेत. ताब्यात घेतलेल्या गाड्यांची किंमत 20 लाख 50 हजार रुपये सांगितली जात आहे.
CCTV ने केली मदत
मंगळवारी पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून शहरात बुलेट चोरीचे रिपोर्ट येत होती. बुलेट चोरण्याच्या पध्दतीवरुन समोर येत होते की, चोर हे एकाच टोळीशी संबंधीत आहेत. ज्या ठिकाणाहून वाहने उचलली गेली तेथून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले आणि मुंबईचे घाटकोपर येथील अमोल शिवाजी ढोबळे (वय 21) एका ठिकाणी बाईक चोरताना दिसला.
दोन्ही आरोपींना अशी केली अटक
याच्या काही दिवसांनंतर क्राइम ब्रांच युनिट-3 चे पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जन्हाड आणि गिरीश चामले यांना माहिती मिळाली की, काही लोक चोरी केलेल्या बाइक सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये विकण्यासाठी येणार आहेत. एका टीमला या डीलवर नजर ठेवण्यासाठी साध्या कपड्यांमध्ये तैनात करण्यात आले. यानंतर अमोल आपल्या साथीदार विशाल खैरे (21 ) सोबत बाइक घेऊन पोहोचला तेव्हा त्यांना पकडण्यात आले.
6 महिन्यात चोरल्या होत्या 15 बाइक्स
सीसीटीव्हीच्या साहाय्याने त्यांचा चेहरा ओळखण्यात आला. तर दोन घटनांमध्ये ते सामिल असल्याचे पुरावे मिळाले. यानंतर कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी 6 महिन्यादरम्यान चोरी केलेल्या बाइक्सची माहिती पोलिसांना दिली. चौकशीमध्ये आरोपींनी सांगितले की, ते मजामस्तीसाठी आणि आपले महागडे शौक पूर्ण करण्यासाठी चोरी करत होते. बुलेटची किंमत जास्त असल्याने ते बुलेटला टार्गेट करत होते.
एका आरोपीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपींजवळून 12 बुलेट आणि 3 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मालाची किंमत 20 लाख 50 हजार आहे. तपासात समोर आले की, विशालच्या विरोधात ठाणे जिल्ह्यामध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.