आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची केंद्राविरोधात निदर्शने:सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने सरकारी यंत्रणेचा गैर वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चालविला आहे, असा आरोप करत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आराजकतेकडे वाटचाल

आंदोलनावेळी बोलताना डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असून लोकशाही धोक्यात आणलीच आहे, परंतु आराजकतेच्या दिशेने या देशाची वाटचाल चालू झाली आहे. याला केवळ मोदी व शहा जबाबदार आहेत.

काँग्रेसने लोकांमध्ये जावे

केंद्र व राज्य यांचे अत्यंत चांगले असलेले संबंध गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर केंद्र सरकार फक्त सूडाचे राजकारण करीत असून ई.डी., सी.बी.आय. सारख्या संस्थाचा गैरवापर करीत आहेत्. काँग्रेस कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरून या सर्व गोष्टी जनतेपर्यंत मांडल्या पाहिजेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी या सर्व गोष्टी संसदेमध्ये व बाहेर लोकांपुढे सतत मांडत आहेत म्हणूनच त्यांचा आवाज दाबण्यासाठी ई. डी. ची चौकशी लावून त्यांच्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार करीत आहे. त्यामुळे आजपासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वावरताना ‘मै भी राहुल गांधी’ असे लोकांपुढे जायला पाहिजे.

भाजपमुळे लोकशाही धोक्यात

आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशामध्ये मोदी व शाह हे लोकशाही धोक्यात आणत आहेत. सार्वजनिक संस्था विकल्यानंतर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ई. डी. चा वापर करून आपण केलेल्या चूका झाकण्याचे काम करीत आहे. राहुल गांधी हे या देशाचे भविष्य असून त्यांच्या सत्य बोलण्याने केंद्रातील मोदी सरकारचे पितळ उघडे पडत आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांना लक्ष्य करून त्यांना ई. डी. मार्फत त्रास देण्याचे काम हे मोदी सरकार करीत आहे.

पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड आदींची भाषण झाली. यावेळी महाराष्ट्राचे सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार प्रणिती शिंदे, आ. राजेश राठोड, आ. लहू कानडे, आ. जयंत आसगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन पार पडले.
पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड आदींची भाषण झाली. यावेळी महाराष्ट्राचे सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार प्रणिती शिंदे, आ. राजेश राठोड, आ. लहू कानडे, आ. जयंत आसगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन पार पडले.
बातम्या आणखी आहेत...