आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुण्याच्या दौऱ्यावर अजित पवार:माझ्याशी दूर उभे राहून बोला, अजित पवारांनी मनसे नगराध्यक्षाला फटकारले; दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा उडाला बोजवारा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि शहर प्रमुख सचिन चिखले यांना अजितदादांशी जवळून बोलायचे होते, त्यामुळे पवारांना राग आला
  • पुण्यात उभारलेल्या जंबो कोविड सेंटरचा अजित पवारांनी घेतला आढावा

पुण्यात देशात सर्वात जास्त सक्रिय कोरोना संक्रमण झाले आहे. शुक्रवारपर्यंत येथे एकूण संक्रमित रूग्ण 1 लाख 264 आहेत, त्यापैकी 30 हजाराहून अधिक अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 2290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता 3 जंबो कोविड सेंटर तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक सेंटरमध्ये 600 ऑक्सिजन बेड आणि 200 आयसीयू बेड आहेत.

अशाच एका जंबो कोरोना सेंटरचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये पोहोचले होते. या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष सचिन चिखले तेथे दाखल झाले होते. त्यांनी अजित पवारांच्या जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला. यामुळे अजित पवार त्यांच्यावर भडकले आणि सर्वांसमोर त्यांना फटकारले. अजित पवार म्हणाले की, 'दूर उभे राहून माझ्याशी बोला.' अजित पवारांच्या या व्यवहारामुळे मनसे नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान या संपूर्ण दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. अजित पवार जिथे जात होते तिथे अधिकारी आणि स्थानिक नेते त्यांच्यामागे येत होते.