आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या भीतीने मानवतेचा विसर:आईच्या मृतदेहाजवळ दोन दिवस भुकेने व्याकूळ होती वर्षभराची मुलगी, कोरोनाच्या भीतीने कुणी हातही लावला नाही; महिला पोलिसांनी वाचवला जीव

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिची एका वर्षाची मुलगी भुकेने तळपत होती. या तान्ह्या बाळाला दोन दिवस कुणीही मदत केली नाही. कोरोनाच्या भीतीने लोक इतके घाबरले की मानवताच विसरलो. अखेर शुक्रवारी दोन महिला पोलिसांनी पुढाकार घेत त्या चिमुकलीची मदत केली. तिला आपल्यासोबत पोलिस स्टेशनला नेऊन तिच्या पोटाची व्यवस्था केली.

पिंपरीतील दिघी येथे मूळची उत्तर प्रदेशातील असलेली महिला आपल्या पती आणि एका वर्षाच्या मुलीसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वीच तिचा पती काही कामानिमित्त उत्तर प्रदेशात गेला आणि आजारी पडला. त्यानंतर महिला आपल्या मुलीसोबत पिंपरीत एकटी पडली. या महिलेचा मंगळवारी किंवा बुधवारी मृत्यू झाला असावा अशी शक्यता आहे. दोन दिवस कुणालाही या गोष्टीचा पत्ता लागला नाही. आसपासच्या घरांपर्यंत गुरुवारी दुर्गंध पसरला होता.

महिला पोलिसांच्या धाडसाने वाचला चिमुकलीचा जीव
घरात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले याची कल्पना आस-पासच्या लोकांना आली होती. परंतु, कोरोनाच्या भीतीने कुणीही आत जाण्याची हिंमत केली नाही. यानंतर शुक्रवारी एका व्यक्तीने पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस काँस्टेबल सुशीला गाभळे आणि रेखा वझे घटनास्थळी पोहोचल्या. दार तोडून त्यांनी आत प्रवेश केला तेव्हा त्यांना धक्काच बसला. मृतदेहाजवळ एका वर्षाची मुलगी चिटकलेली होती. ती भुकेने व्याकूळ होती. कुठलीही भीती न बाळगता त्यांनी मुलीला हातात घेतले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

काँस्टेबल सुशीला गाभळे यांनी सांगितल्याप्रमाणे, भुकेने मुलीची अवस्था अतिशय वाइट झाली होती. आणखी काही तास कुणी आले नसते तर आणखी एक अनर्थ घडला असता. आम्ही त्या मुलीला अंगावर घेऊन बिस्किट खाऊ घातले आणि दूधही दिला. यानंतर तिला डॉक्टरांकडे दाखवून औषधोपचार केले. तिच्या वडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. आल्यानंतर मुलगी त्यांना सोपविली जाईल.

शेजाऱ्यांनी पोलिसांनाही मदत केली नाही
दिघी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले, की महिलेला किंवा मुलीला तर सोडाच शेजाऱ्यांनी घटनास्थळी आलेल्या पोलिसांना देखील मदत केली नाही. कोरोनाच्या भीतीने त्यांनी मुलीला हात देखील लावला नाही.बाल कल्याण समितीच्या निर्देशानुसार आम्ही मुलीला चाइल्ड केअर होममध्ये पाठवले आहे. मुलीच्या आईचे नाव सरस्वती राजेश कुमार होते. ती 29 वर्षांची होती. तिच्या मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ काय होते हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर कळेल.

बातम्या आणखी आहेत...