आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासादायक:पुण्यात कोरोना संक्रमित महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म, दोघेही कोरोना निगेटिव्ह

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
दोन्ही मुलांना सध्या रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये ठेवले आहे. - Divya Marathi
दोन्ही मुलांना सध्या रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये ठेवले आहे.
  • कोरोना संक्रमित महिलेने निरोगी जुळ्या मुलांना दिला जन्म, दोन्ही मुले कोरोना निगेटिव्ह

पुण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात शहरातील एका खासगी रुग्णालयात एक कोरोना पॉझिटिव्ह महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. विशेष बाब म्हणजे दोन्ही मुलांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या मुलांच्या आईला त्यांच्यापासून दूर एका आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. पूर्णपणे बरे होईपर्यंत मुलांपासून दूर रहाण्याचा सल्लाही आईला देण्यात आला आहे.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर झाली कोरोनाची पुष्टी 
 
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी पुण्यातील इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयात या महिलेने मुलांना जन्म दिला. या महिलेला शरीरावर सूज आणि पोटात होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. येथे उच्च रक्तदाबामुळे महिलेची तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांना शंका आली. महिला ज्या भागात राहते तेथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरला आहे. यानंतर डॉक्टरांनी तिची कोरोना चाचणी केली असता तिला संसर्ग झाल्याचे आढळले. 

अशाप्रकारे वाचला महिलेचा जीव

यानंतर, महिलेची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी तिचे सी-सेक्शन ऑपरेशन केले. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे या महिलेने मुलगी व मुलाला जन्म दिला आहे. दोन्ही मुले पूर्णपणे निरोगी आहेत. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "जुळ्या मुलांसह गर्भवती असल्यामुळे तिला आपत्कालीन परिस्थितीत भरती केले होते." पुढे त्यांनी सांगितले की, महिला रेड झोनमधून आल्यामुळे आम्ही कोरोनाचे लक्षण दिसताच तिची चाचणी केली होती. सध्या दोन्ही मुले सध्या सुरक्षित असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...