आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांची मिश्किल टिप्पणी:'माझा फोटो लावला तर जे लोक लस घेण्यासाठी येणार होते, ते पण येणार नाहीत'- अजित पवार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मला लस घेताना फोटो काढण्याची नौटंकी आवडत नाही'

मागील काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात जिल्हाधिकारी, महापौर, महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी परिस्थिती नियंत्रणात न आल्यास एप्रिलमध्ये लॉकडाउनचा इशारा दिला. दरम्यान, यावेळी त्यांच्या एका मिश्किल टिप्पणीने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनेक नेते सोशल मीडियावर फोटो टाकतात. पण, माझा फोटो टाकला तर जे लोक येणार आहेत, तेपण लस घेण्यासाठी फिरकणार नाही. त्यांच्या हा विधानाने सर्वांना हसू अनावर झाले. तसेच, 'मला लस घेताना फोटो काढण्याची नौटंकी आवडत नाही. इतर नेते कदाचित लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी लस घेतानाचे आपले फोटो शेअर करत असतील. पण मी लस घेतानाचा माझा फोटो टाकणार नाही,' असेही त्यांनी यावेळी म्हटले.

तुर्तास लॉकडाऊन नाही, पण निर्बंध लागू

यावेळी अजित पवारांनी सध्या तरी पुण्यात लॉकडाउन लागू करणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पुण्यात सध्या तरी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. पण कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदीही कायम राहणार आहे. या नियमांचे पालन केले नाही तर 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल.

शाळा-कॉलेज 30 एप्रिलपर्यंत बंदच

अजित पवार पुढे म्हणाले की, 'पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शाळा-कॉलेज हे 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. याआधी 31 मार्चपर्यंत शाळा कॉलेज बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पुण्यातील उद्यान केवळ सकाळी उघडी राहतील. मॉल आणि थिएटर 50 टक्के संख्येने सुरू राहणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...