आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मॉल, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मोठी दुकाने या ठिकाणच्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी बंधनकारक करावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना केली. विधानभवन सभागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी लोकप्रतिनिधींनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले की, पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल सोमवारी प्राप्त होणार आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे चौकशी करीत असून या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. दरम्यान, पत्रकारांना ‘कोरोना योद्धा’ या क्षेत्रात ग्राह्य धरण्याबाबत येत्या कॅबिनेटमध्ये सकारात्मक चर्चा करू, असे टोपे यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.