आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियम मोडणारा फॅशन शो:पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी विना मास्क केले रॅम्प वॉक, 200 पेक्षा जास्त उपस्थितांकडून कोरोना नियमांची पायमल्ली

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फॅशन शो च्या आयोजकाविरोधात खटला दाखल

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरही पिंपरी चिंचवडमध्ये एका फॅशन शो चे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या फॅशन शो मध्ये पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा माई ढोंरे सामील झाल्या आणि त्यांनी विना मास्क रॅम्प वॉकही केला. या कार्यक्रमात 200 पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते आणि उपस्थितांकडून कोरोना नियांचे उल्लंघन केल्याचेही निदर्शनास आले. हा कार्यक्रम भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता.

या प्रकरणाला गांभीर्याने घेत पोलिसांनी महापौरांचे पूत्र जवाहर मनोहर ढोरेंविरोधात IPC कलम 188 अंतर्गत खटला दाखल केला आहे. यापूर्वी, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील महापौर उषा ढोरे यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती.

200 पेक्षा जास्त लोक सहभागी झाले

या फॅशन शो चे आयोजन पिंपरी चिंचवडमधील प्राध्यापक रामकृष्ण मोरे ऑडिटोरियममध्ये सोमवारी करण्यात आले होते. या शो मध्ये 200 पेक्षा जास्त लोक सामील झाले होते आणि त्यातील अनेकांनी मास्क घातला नव्हता. फॅशन शोदरम्यान एक डान्सचा प्रोग्रामही झाला, यातही कुणीच मास्क घातले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...