आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात दररोज 370 टनची मागणी:पुण्यात दोन खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन संपल्याने चौघांचा मृत्यू; रुग्ण व नातेवाइकांचा जीव लागला टांगणीला

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असल्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

चाकण येथील एका खासगी रुग्णालयातील अाॅक्सिजन संपल्याने तीन जणांना जीव गमवावा लागला, तर हडपसर मध्येही अशाप्रकारे एकास अाॅक्सिजनाच्या अभावी प्राणास बुधवारी मुकावे लागले. पुण्यात प्रामुख्याने एअर लिक्विड, लिंडे इंडिया, बेल्लारी स्टील, टायाे निप्पाॅन सॅनगाे इंडिया, अायनाॅक्स एअर प्रॉडक्ट्स या पाच अाॅक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्या अाॅक्सिजन पुरवठा करतात. तर, रायगड येथील जेएसडब्लयू कंपनीकडून अतिरिक्त अाॅक्सिजन साठ्याची मागणी करण्यात अाली. जिल्ह्यातील अाॅक्सिजन वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात अाली असून अाॅक्सिजन वितरणाबाबत अद्ययावत माहिती ठेवण्याची जबाबदारी देण्यात अाली.

पुणे जिल्ह्यात दरराेज साधारण ३७० टन अाॅक्सिजनची मागणी अाहे. परंतु कंपन्यांकडून अाॅक्सिजनचे वितरण कमी प्रमाणात वितरण झाल्याने विविध रुग्णालयांत अाॅक्सिजनचा तुटवडा निर्माण हाेताे. काही तासांपुरताच अाॅक्सिजन साठा शिल्लक राहत असल्याने नातेवाइकांना दुसऱ्या रुग्णालयात रुग्णाला हलवण्यास अचानक सांगितले जात असल्याने नातेवाइकांची धावपळ उडत अाहे. रुग्णालयांमधील अाॅक्सिजन पुरवठा कमी झाल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून कुटुंबीय हवालदिल झाल्याचे दिसून येते. पिंपरी चिंचवड शहरातही शासकीय रुग्णालयात ८० टन अाॅक्सिजनची गरज अाहे. परंतु पुरवठा मर्यादित हाेत असल्याने रुग्णांच्या जिवाला धाेका निर्माण हाेत अाहे.

रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याने नातेवाइकांचा डॉक्टरांना चोप
पुणे | कार्डियाक रुग्णवाहिकेतच हॉस्पिटलच्या दारात रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण करून हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. ही घटना कोंढव्यातील प्राइम हॉस्पिटलमध्ये मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉ. सिद्धांत तोतला (रा. मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. कोंढवा येथील प्राइम हॉस्पिटलमध्ये डॉ. तोतला हे मध्यरात्री साडेबारा वाजता व्हिजिटला आले होते. त्यावेळी एक कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन आली होती. डॉ. तोतला यांनी त्याला तपासले तेव्हा रुग्णाची नाडी लागत नव्हती. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना कळविले.

डॉ. ताबीश व डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णाला तपासले. त्यांनी तेथे जमलेल्या १५ ते २० जणांना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हे समजल्यावर त्यांनी डॉ. तोतला यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाइपने मारहाण केली. तसेच हॉस्पिटलमधील अकाउंटंट इमाम हुल्लर यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. सुरक्षा रक्षकाच्या केबिनची काच फोडून नुकसान केले. हॉस्पिटल समोरील दरवाजावर दगड फेकले. दरवाजा समोरील कुंडीमधील झाडे फेकून देऊन नुकसान केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त देशमुख, पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक ऐ. के. चाऊस यांनी प्राइम हॉस्पिटलला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

उद्याेगांना अाॅक्सिजनचा तुटवडा
अाैद्याेगिक शहर म्हणून पुण्याची अाेळख असून उद्याेगांना अाॅक्सिजनची कमी भासत असते. स्टील कटिंग व फॅब्रिकेशन कामासाठी अाॅक्सिजनची गरज असते. परंतु काेराेना रुग्णसंख्या वाढीमुळे जिल्हा प्रशासनाने उद्याेगांचा अाॅक्सिजन साठा बंद करत सर्व अाॅक्सिजन पुरवठा रुग्णालयांना करण्यात येईल, असे अादेश दिले असल्याने मागील काही दिवसांपासून उद्याेगांचे चक्र अाॅक्सिजन अभावी अडकले अाहे.

बातम्या आणखी आहेत...