आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:कोरोनामुक्त होऊन घरी आल्यानंतर रुग्णाचे डीजे वाजवून स्वागत, 15 जणांवर गुन्हा दाखल

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्राम पंचायतीचे माजी सदस्य उमेश उर्फ टक्या कोरोना संक्रमित झाल्यानंतर 14 दिवस क्वारेंटाइन होते
  • गुरुवारी ठीक होऊन घरी आल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कुटुंबियांनी डीजे लावून त्यांचे स्वागत केले

संक्रमण काळात अतिउत्साहाने कशी तुरुंगाची हवा खावी लागले, हे या घटनेवरुन पाहायला मिळाले. येथील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठीक झाल्यानंतर घरी गेल्यावर कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांची डिजे लावून त्याचे स्वागत केले. यामुळे आता 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्याजवळील लोनी काळभोरच्या ग्राम पंचायतीचे माजी सदस्य उमेश उर्फ टक्या कोरोना संक्रमित झाल्यानंतर 14 दिवस क्वारेंटाइन होते. गुरुवारी ठीक होऊन घरी आल्यानंतर त्यांचे समर्थक आणि कुटुंबियांनी डीजे लावून त्यांचे जंगी स्वागत केले. यादरम्यान गावकऱ्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नव्हते. याची माहिती मिळताच लोनी पोलिसांनी उमेशसह 15 जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser