आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुण्यातील केशवनगर भागात राहणाऱ्या एका 56 वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी शहरातील ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते पुण्यातील घोरपडी गावात दवाखाना चालवत होते. कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर त्यांना 13 मे रोजी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता त्यांना मृत घोषित केले. कोरोनामुळे पुण्यातील डॉक्टरचा हा पहिला मृत्यू आहे. ससून रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना, न्यूमोनाइटिस, अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, मायोकार्डिटिस आणि किडनी प्रॉब्लममुळे डॉक्टरचा मृत्यू झाला.
डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण
पुणे महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हनकरे म्हणाले की, डॉक्टरांच्या मृत्यूच्या बातमीमुळे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोक, विशेषतः सामान्य चिकित्सकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. यापैकी बहुतेकांनी आपली दवाखाने आधीच बंद केली आहेत."
पुण्यात 5 हजाराहून अधिकांना कोरोनाची लागण
पुण्यात जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवासात कोरोनाचे 358 नवे रुग्ण आढळले. यासोबत जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजार 167 वर पोहचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 257 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात 4,471, पिंपरी-चिंचवडमध्ये 253 आणि ग्रामीण भागातून 443 रुग्ण समोर आले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.