आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे कोरोना:महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ उपमहापौर सरस्वती शेडगे यांच्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निस्पन्न झाल्यानंतर आता पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेडगे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासह पालिकेतील सहा नगरसेवकही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

शनिवारी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता  पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेडगे यांच्यासह सहा नगरसेवकांनाही कोरोना झाल्याचे समोर आले. 'थोडासा ताप आल्याने मी माझी COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील,' अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटरवरुन दिली होती. दरम्यान, पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने पालिका कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

0