आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:पुण्यात कोरोना रुग्णांवर होणार घरीच उपचार, रुग्णालयात बेडची कमतरता भासत असल्याने प्रशासनाचा निर्णय

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी नवल किशोर राम - फाइल फोटो
  • रुग्णालय प्रशासनाने नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वच रुग्णालये आणि खासगी हॉस्पिटल्स रुग्णांनी भरली आहेत. यामुळे कोरोना रुग्णांना वेळेवब बेड मिळत नाहीयेत. कोरोनाच्या अति गंभीर रुग्णांना रुग्णालयात बेड मिळावेत यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्‍य लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांचे समुपदेशन करुन त्‍यांना घरी पाठविण्‍यात यावे, असे आदेश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी काढले आहे. खासगी रुग्णालयातही बेड उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला.  

पुण्यात लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचार करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. अशा रुग्णांचे समुपदेशन करुन घरीच उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत पुण्यातील खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर सूचना देण्यात आल्या. दरम्यान रुग्णालय प्रशासनाने नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशाराही दिला.

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी 1904 नव्या रुग्णांनी वाढ, 29 जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी 1904 नव्या रुग्णांनी वाढ झाली. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 46 हजार 872 वर पोहचली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभरात 29 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1243 वर पोहचली. शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 773 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण 21 हजार 107 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.