आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यातील रंगीत तालीम:पुण्यात कोरोना व्हॅक्सीनची रंगीत तालीम, अशा प्रकारे 4 टप्प्यांमध्ये करण्यात आली लसीकरण प्रक्रियेची विभागणी

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना लसीकरण मोहिम केंद्र शासनाकडून लवकरच सुरू करण्यात येणार असून याचीच रंगीत तालीम आज पुणे जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांमध्ये घेतली गेली. यामध्ये लस उपलब्ध झाल्यानंतर घेण्यात येणाऱ्या लसीकरण सत्राची रंगीत तालीम घेतली. महत्त्वाचे म्हणजे या वेळी कोणालाही लस दिली नाही. तर फक्त त्याचा सराव करण्यात आला. हिंजवडी-माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आरोग्य संचालिका डॉ अर्चना पाटील, सहसंचालक डॉ. डी एन पाटील, पुणे जिल्ह्य परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , जिल्ह्य आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी भेट देऊन ड्राय रन लसीकरणाची पाहणी केली.

पहिला टप्पा
पुणे जिल्ह्यात ग्रामीणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका मुळशी तर पुणे शहरात जिल्हा रुग्णालय औंध आणि पिंपरी-चिंचवड भागात जिजामाता आरोग्य केंद्र या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी पंचवीस लाभार्थी असणार आहेत.लसीकरणाच्या ठिकाणी तीन खोल्या तयार करण्यात आलेले आहेत.

दुसरा टप्पा
वेटिंग Room - या रूममधील व्हेरिफाय कडे लाभार्थ्याची यादी असेल त्यामध्ये असणाऱ्या लाभार्थ्यांना वेटिंग रूम मध्ये प्रवेश दिला जाईल.
Vaccination Room येथे लस टोचकाद्वारे लाभार्थ्यांना लस देण्यात येईल. Observation Room - लसीकरणानंतर लाभार्थ्याला तीस मिनिटे पाहणी करण्याकरता या रूममध्ये ठेवण्यात येईल.

तिसरा टप्पा
या संपूर्ण लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी पाच जनांची टीम तयार करण्यात आलीय. यामध्ये सुरक्षारक्षक, टोचक, निरीक्षक, पडताळणीधारक,संघटक असणार आहेत.

चौथा टप्पा
या संपूर्ण लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी पाच जनांची टीम तयार करण्यात आलीय. यामध्ये सुरक्षारक्षक, टोचक, निरीक्षक, पडताळणीधारक,संघटक असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...