आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईच्या शेवटच्या इच्छेसाठी:हिंदू महिलेचा मुस्लिम पद्धतीने झाला दफनविधी, मुलीने सांगितले यामागचे कारण

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृत्यूनंतर कोरोनाची पुष्टी, मुलीकडून NOC घेतला

पुण्यात राहणाऱ्या एका मुलीने आपल्या आईच्या शेवटच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी मुस्लिम पद्धतीने दफनविधी केला. मरणापूर्वी पुण्यातील इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या छगनबाई किशन ओव्हाल यांनी आपली मुलगी लक्ष्मीला शेवटची इच्छा सांगितली होती. त्या म्हणाल्या होत्या- रमजानच्या पवित्र महिन्यात मेले तर जाळू नका, दफन करा.

आईच्या मृत्यूनंतर मुलीनेही आईच्या शेवटच्या इच्छेचा मान ठेवला. बुधवारी 72 वर्षीय छगनबाई ओव्हाल यांचा येरवडातील जय जवान नगरमधील मुस्लिम कब्रस्तानमध्ये दफनविधी पार पडला. लक्ष्मी यांनी सांगितले की, आईच्या शरीरात गाठी झाल्या होत्या, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मंगळवारी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि शिवाजी नगरच्या जंबो हॉस्पीटलमध्ये घेऊन जात असताना मृत्यू झाला.

मृत्यूनंतर कोरोनाची पुष्टी, मुलीकडून NOC घेतला

हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ससून रुग्णालयातून मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यास सांगितले. यानंतर त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला. येथे तपासणी केली असता, त्यांना कोरोनाचे निदान झाले. मृत्यू प्रमाणपत्र बनवल्यानंतर कोरोना प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यविधी करायचा होता. यावेळी लक्ष्मी यांनी आईचा मुस्लिम पद्धतीने दफनविधी करण्याचा हट्ट पकडला. पण, धर्माने हिंदू असल्यामुळे मुस्लिम कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्याची हिम्मत हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांना होत नव्हती. यानंतर लक्ष्मी यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले जिल्हा प्रशानाची परवानगी मिळाल्यानंतर बुधवारी पहाटे कब्रस्थानमध्ये त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळी 'मूल निवासी मुस्लिम मंच'चे अध्यक्ष अंजुम इनामदारसह मुस्लिम समाजातील इतर लोकांनी मुस्लिम पद्धतीने नमाज अदा करुन छगनबाई यांना दफन केले.

बातम्या आणखी आहेत...