आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी:पुण्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांत 0-18 वयोगटातील मुलांचे 10% प्रमाण; संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांसाठी सहा हजार खाटा

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षीपासून काेराेनाचा प्रादुर्भाव देशभरात थैमान घालत असून कुटुंबासाेबतच अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला अाहे. राज्यात पुण्यात सर्वप्रथम काेराेनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर अातापर्यंत तब्बल पाच लाख ९६ हजार काेराेना रुग्ण केवळ पुणे जिल्ह्यात अाढळले. काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर अधिक हाेण्याची शक्यता वर्तवली जात असून अातापर्यंतच्या काेराेनाबाधितांमध्ये तब्बल १० टक्के लहान मुले असल्याचे दिसून अाले. त्यामुळे प्रशासनातर्फे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धाेका लक्षात घेऊन शासकीय अाणि खासगी रुग्णालयांत पाच हजार ८५८ खाटांचे नियाेजन केले गेले.

पुणे जिल्ह्यात अातापर्यंत ६१ हजार ३०९ लहान मुले काेराेनाबाधित झाली असून ० ते १८ वयोगटातील पुणे शहरात २६ हजार २५७ मुले, पिंपरी-चिंचवड शहरातील १५ हजार ९२८ अाणि पुणे ग्रामीणमधील १९ हजार १२४ मुलांचा समावेश अाहे. परंतु त्यापैकी ५९ हजार ५५९ मुले काेराेनातून बरे झाली असून एक हजार ७४१ मुलांवर अद्याप उपचार करण्यात येत अाहेत. यादरम्यान मात्र नऊ मुलांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा धाेका अाेळखून काेविड केअर सेंटरसाेबतच काेराेनाबाधित मुलांना राहण्यासाठी अाकर्षक रंगरंगाेटी केलेल्या खाेल्या अाणि विविध खेळांच्या साहित्याची उपलब्धता करण्यात येते.

शासकीय रुग्णालयात चार हजार बेड तर ६५ खासगी रुग्णालयात एक हजार ८५२ बेड उपलब्ध करण्यात अाले. त्यापैकी तीन हजार अाॅक्सिजन बेड केवळ मुलांसाठी उपलब्ध करण्यासाेबत त्यांना अायसीयू अाणि व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा जाणार नाही याची दक्षता घेण्यात येते. म्यूकरमायकाेसिसचा धाेकाही लक्षात घेता बालकांसाठीच्या काेराेना सेंटरसाठी ईएनटी, एमडी मेडिसिन, न्यूराेलाॅजिस्ट, बालराेगतज्ज्ञ असे एक हजार विशेषज्ञ डाॅक्टर व १५२४ प्रशिक्षित मनुष्यबळ व नर्सची भरती करण्यात अालेली अाहे.

मुलांची काळजी घेतली तर धोका कमी
सह्याद्री रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ प्रमुख डॉ. प्रदीप सूर्यवंशी म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुलांमध्ये प्रादुर्भाव प्रमाण २ टक्क्यांपेक्षा कमी होता. मात्र, तेच प्रमाण दुसऱ्या लाटेत ७ टक्क्यांनी वाढले. त्यामुळे तिसऱ्या लाटेत किमान दहा वर्षांखालील मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गाफील न राहता पुढील सहा महिने त्यांची खबरदारी घ्यावी.
संग्रहित फोटो

जंकफूड न खाल्ल्याने मुले ठणठणीत
लॉकडाऊनदरम्यान मुले घरातच आहेत. तसेच अनेकांनी जंकफूड खाणे टाळल्याने ते या काळात कमी प्रमाणात आजारी पडल्याचे दिसून येते. छोट्या बाळांमध्ये कोरोनाची लागण झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केल्यास ती लवकर बरी होऊ शकतील. मुलांचा मोबाइल, टीव्हीवरील स्क्रीनटाइम कमी करून पालकांनी त्यांना वेळ देत विविध गोष्टीत गुंतवून ठेवणे आवश्यक आहे.


बातम्या आणखी आहेत...