आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यातील व्यवस्थेचा ढिसाळ कारभार:रुग्णालयात बेड न मिळाल्याने घरीच झाला कोरोना रुग्णाचा मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने हातगाडीवर स्मशानभूमीत नेला मृतदेह

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महापालिकेने या संपूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहे
  • पुण्यात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजारांच्या पार गेली आहे

पुण्यात 2 लाख 14 हजारांहून अधिक संक्रमित रुग्ण आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्याचे मोठे प्रकरण समोर आले आहे. शहरातील खडकवासला भागात रुग्णालयात बेड नसल्यामुळे कोरोनाच्या एका रुग्णाचा घरीच मृत्यू झाला. यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याचा मृतदेह 6 तास घरातच राहिला. नंतर एका हातगाडीवर मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जावा लागला. हा ढिसाळ कारभार समोर आल्यानंतर पालिकेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

बुधवारी, कोरोना संक्रमित 40 वर्षीय गणेश तिकोने याचा रुग्णालयात बेड न मिळाल्याने मृत्यू झाला. गणेश आपल्या कुटूंबासह खानापूर गावात राहत होते. ते मासे विक्रीचा व्यवसाय करत करायचे. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागानं त्यांना बेडांची कमतरता असल्याचे सांगून घरीच थांबण्यास सांगितले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी गणेश यांची प्रकृती खालावली. यानंतर कुटुंबियांनी त्यांना जवळच्या तीन रुग्णालयात नेले. पण रिकामे नाही असे सांगत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. यानंतर त्यांना घरी आणण्यास भाग पाडले गेले आणि बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.

मृतदेहावर पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करताना ग्राम पंचायत सदस्य
मृतदेहावर पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करताना ग्राम पंचायत सदस्य

ग्रामपंचायत सदस्यांनी केले अंतिम संस्कार
सकाळी दहा वाजेनंतर त्यांचा मृतदेह संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह एका खोलीत पडून होता. या प्रकरणाची माहिती गावातील सरपंचांना समजताच त्यांनी प्रथम महापालिकेत फोन करुन रुग्णवाहिकेची मागणी केली. पण बराच काळात रुग्णवाहिका पोहोचली नाही. तेव्हा त्यांनी पीपीई किट घालून मृतदेह स्मशानभूमीत नेण्याचा निर्णय घेतला. गावातल्या काही लोकांनी हातगाडीची व्यवस्था केली आणि मृतदेह बॉडी बॅगमध्ये टाकून स्मशानभूमीत नेण्यात आला.

कुटुंबाने लावला निष्काळजीपणाचा आरोप
गणेशाच्या एका भावालासुद्धा कोरोना आहे आणि घरीच उपचार सुरु आहेत. प्रशासनाने या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वीही रुग्णवाहिका आणि बेड्स नसल्यामुळे उपचारांमध्ये उशीर झाला आणि शहरात पत्रकार आणि माजी महापौरांचाही मृत्यू झालेला आहे. या दोन्ही प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.

पुण्यात आतापर्यंत संक्रमणामुळे 4614 मृत्यू
गेल्या 24 तासात पुण्यात 2078 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर संक्रमणाचा आकडा 2 लाख 14005 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल झालेल्या 36 हजार 805 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 4614 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser