आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारीमुळे पुणे शहराची परिस्थिती अनियंत्रित होत चालली आहे. शहरात गेल्या चोवीस तासांत 9,086 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा गेल्या चोवीस तासांतील देशातल्या कोणत्याही शहरातील सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. यापुर्वी दिल्ली येथे 1 नोव्हेंबर 2020 रोजी सर्वात जास्त 8,593 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले होते. त्यामुळे काल झालेल्या पत्रकार परिषदेत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहरात एका आठवड्यांसाठी मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे.
नवीन रुग्णांच्या बाबतीत पुणे जगातील 207 देशांच्या पुढे
पुणे शहराचे आकडे यामुळे भीतीदायक आहेत. कारण येथे गेल्या चोवीस तासांतील रुग्ण संख्या 207 देशांपेक्षा जास्त आहे. नवीन कोरोनाबाधीत रुग्ण सापडण्याच्या यादीमध्ये पुणे शहराने ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांग्लादेश आदी देशांना मागे पिछाडीवर सोडले आहे. पुणे शहरात आतापर्यंत 5 लाख 51 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना महामारीच्या विळ्याख्यात आले असून यामध्ये 10,097 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांत शहरात 9,086 रुग्ण सापडले असून त्यामध्ये 58 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3,337 लोकांवर सध्याघडीला उपचार सुरु आहेत.
पुण्यात आजपासून हे नवीन नियम असणार
सामजिक कार्यक्रमांवर आठवडाभरांसाठी बंदी
पुणे शहरात होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांवर एक आठवडयासाठी बंदी असणार आहे. यामध्ये लग्नसमारंभसाठी 20 लोकांना परवानगी असेल. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राव यांनी दिली.
याबाबत सौरभ राव म्हणाले की, 'जिल्ह्यातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील.
परीक्षांचे काय?
सौरभ राव पुढे म्हणाले की, दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.