आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण:800 खाटांच्या जंबो रुग्णालयात फक्त 30 आयसीयू बेड शिल्लक, शहरातील संक्रमितांचा आकडा 1 लाख 75 हजार पार पोहोचला

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यात एका महिलेची तपासणी करताना मनपाचे आरोग्य कर्मचारी.
  • पुण्यात 24 तासांत 1695 नवीन रुग्ण आढळले तर 28 जणांचा मृत्यू झाला
  • शहरातील एकूण मृत्यूसंख्या 4 हजार 500 पेक्षा जास्त झाली आहे

कोरोना संक्रमणाच्या बाबतीत पुणे हे देशातील सर्वाधिक बाधित शहर बनले आहे. 1.75 लाखापेक्षा जास्त संक्रमितांसोबत पुण्याने दिल्लीला मागे टाकले. ऑगस्टच्या सुरुवातीच्या काळात 91,903 रुग्णांसह पुणे संक्रमित रुग्णांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर होते. मात्र एका महिन्यात येथे सर्वाधिक 83 हजार रुग्ण वाढले. मागील 24 तासांत येथे 1695 नवीन रुग्ण आढळले आणि 28 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबत पुण्यातील मृतांचा आकडा 4 हजार 500 पेक्षा जास्त झाला आहे. या दरम्यान पुण्यात एका कोरोनाबाधित पत्रकाराचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्याच्या निधनानंतर उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुण्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील जास्त आहे. येथे सध्या 52 हजारांपेक्षा जास्त अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. कधी सर्वाधिक संक्रमित राहिलेल्या मुंबईत फक्त 20 हजार आणि दिल्लीत 15 हजार अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. गेल्या काही आठवड्यांत पुण्यातील सक्रिय रुग्ण वेगाने वाढले आहेत. म्हणजेच बहुतेक संक्रमण हे अलिकडच्या दिवसांतले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून चाचण्यांची वाढलेली संख्या यामागचे कारण सांगण्यात येत आहे.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही प्रदेशात 50 टक्क्यांहून अधिक लोकांना संसर्ग झाल्यानंतर संसर्ग दर हळूहळू कमी होतो. मात्र पुण्यात वाढत्या संसर्गाची गती कमी होण्यास सुरूवात झालेली नाही.

तात्पुरत्या रुग्णालयात फक्त 30 आयसीयू बेड शिल्लक

पुणे महानगरपालिकेने खुलासा केला की, अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारलेल्या तात्पुरते जंबो रुग्णालयात फक्त 30 आयसीयू बेड शिल्लक आहे. हे रुग्णालय गरीब आणि गरजू रुग्णांसाठी तात्पुरते तयार केले गेले होते. येथे 600 ऑक्सिजन बेड आणि 200 आयसीयू बेड होते. हे सर्व जवळजवळ फूल होण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचीही मोठी कमतरता आहे. त्यामुळे आता येथे नवीन रुग्णांना भरती केले जात नाही. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या रुग्णालयाचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी केले होते.

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाले, "महापालिका अधिकाऱ्यांना जंबो सुविधेसाठी रुग्ण भरती करण्याची जबाबदारी दिली जाते. यासाठी पीएमसी कर्मचार्‍यांची टीम 24 तास तैनात केली आहे. ही टीम रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधून त्यांना सर्व शक्य त्या सुविधा पुरवते." रुबल अग्रवाल म्हणाल्या, "पुण्यातील सर्व जंबो हॉस्पिटलमधून आयसीयू बेड संदर्भात माहिती मागवण्यात आली आहे. सुविधेतील कमतरतेसाठी जबाबदार असलेल्या एजन्सींवर आम्ही योग्य कारवाई करणार आहोत. गरजू रुग्णांना वेळीच रुग्णालयात उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करू."