आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात आत्महत्यांचे सत्र:कौटुंबिक वादातून दांपत्याची गळफास घेऊन आत्महत्या, 2 दिवसांत 5 जणांची आत्महत्या

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 15 दिवसांत सुमारे 30 जणांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आत्महत्या केली

शहरात सलग तिसऱ्या दिवशी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी नैराश्यातून एकाच कुटुंबातील दोन मुलांसह दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना भवानी पेठेत एका नेपाळी दांपत्याने कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे, तर चांदणी चौकाजवळील डुक्कर खिंड येथे दीडशे फूट उंच असलेल्या टेकडीवरून एका अनोळखी महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. इतर दोन घटनांत दोघांनी आपला जीव दिला. दरम्यान, गेल्या 15 दिवसांत सुमारे 30 जणांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आत्महत्या केली.

सूरज लालसिंग सोनी (२७) आणि करिना सूरज सोनी (२२, दोघेही रा. विश्राम सोसायटी, पदमजी पार्क) अशी आत्महत्या केलेल्या दांपत्याची नावे आहेत. टेकडीवरून उडी घेतलेल्या महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाही. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पलांडे यांनी सांगितले, सूरज हा मूळचा नेपाळ येथील रहिवासी आहे, तर करिना ही मूळची गुजरातची आहे. सूरज आणि करिना यांचा अकरा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मागील चार महिन्यांपासून ते विश्राम सोसायटी येथे एका छोट्याशा खोलीत राहण्यास आले होते. करिनाचा भाऊही त्यांच्याबरोबर राहत होता. 

पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वारंवार खटके उडत होते. शनिवारी सूरज कामावरून आल्यानंतर त्याच्यात जोरदार भांडणे झाली. याच भांडणामुळे सूरज आत खोलीत झोपला तर करिना आणि तिचा भाऊ बाहेर अंगणात झोपले होते. रविवारी (२१ जून) सूरजच्या मेहुण्याने घराचा दरवाजा वाजवला. मात्र, सूरजने दरवाजा न उघडल्याने त्याला संशय आला. त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता त्याने छताच्या अँगलला ओढणी बांधून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याने करिनाला ही माहिती दिली. त्यानंतर या घटनेची माहिती फुलगेट येथील सूरजाच्या भावाला देण्यासाठी मेहुणा घराबाहेर पडला. याच दरम्यान करिनानेदेखील आतमध्ये जाऊन छताच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरजचा भाऊ आणि मेहुणा पुन्हा सोसायटीच्या आवारातील खोलीत आले तेव्हा खोलीत डोकावून पाहिले असता करिनानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

सहकारनगरमध्येही आत्महत्या: सहकारनगर भागात शुभम राजेंद्र बोबडे (२३) याने गळफास घेऊन रविवारी आत्महत्या केली. धायरीतील मंडप व्यावसायिक स्वप्निल उत्तम रायकर यांनीही आत्महत्या केली. गेल्या पंधरा दिवसांत पिंपरीतही आत्महत्या करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. आर्थिक विवंचना, कौटुंबिक वाद, नैराश्यातून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

डुक्कर खिंड परिसरात महिलेची आत्महत्या

चांदणी चौक डुक्कर खिंड येथील अंदाजे दीडशे फूट उंच असलेल्या टेकडीवरून एका अनोळखी महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. संबंधित मृत महिलेचे वय अंदाजे ३५ वर्षे आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...