आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:कोरोनामुळे घरी कोणी मरण पावल्यास स्वत:च लावावी लागेल योग्य विल्हेवाट; पुणे महानगरपालिकेचा नवीन नियम

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे महानगरपालिकेचे नवीन नियमानुसार आता सर्व जबाबदारी कुटुंबाना पार पाडावी लागेल

पुणे शहरात जर कोणी कोरोनामुळे घरीच मृत्यूमुखी पडले तर आता सर्व जबाबदारी कुटुंबातील सदस्यांना पार पाडावी लागणार आहे. हा नवीन नियम पुणे महानगरपालिकाने तयार केला आहे. यानुसार मृत व्यक्तीच्या घरातील सदस्यांना स्थानिक प्रशासनाच्या वार्ड अधिकार्‍यांकडून मृतदेहांसाठी बॉडी बॅग आणि चार पीपीई किट देण्यात येणार आहे. संबंधित कुटुंबातील व्यक्तींना पीपीई किट घालून मृतदेहांना बॉडीमध्ये ठेवावे लागेल. त्यानंतर ते शव नेणार्‍या गाडीमध्येदेखीन स्वत:लाच ठेवावे लागणार आहे. विशेष म्हणजे त्यामुळे आता सर्व प्रक्रिया घरातील सदस्यांनाच पार पाडावी लागेल.

मृतदेहांची ने-आण करण्यासाठी गाडीचे खालील नंबर देण्यात आले आहेत. 02024503211, 02024503212 आणि 9689939628 या नंबरवर कॉल करुन गाडीला बोलाविता येणार आहे.

परिवातील सदस्यांना पेपर वर्कही करावे लागणार
कोरोना महामारीमुळे मृत्यू व्यक्तीच्या घरातील सदस्यांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरीता काही कागदोपत्री कारवाही करावी लागणार आहे. यामध्ये त्यांना 4A सर्टिफिकेट और Form 2 भरावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...