आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराईत गुन्हेगार उमेश वाघमारे टोळीविरूद्ध मोक्का:पोलिस आयुक्त रितेशकुमार यांची नववी कारवाई

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार उमेश वाघमारे टोळीविरूद्ध मोक्कानुसार पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार, आज कडक कारवाई केली आहे.

या टोळीने खडक परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने संबंधित वाघमारे टोळीवर मोक्का कलमानुसार कारवाई करण्यात यावी याबाबतचा अहवाल खडक पोलिसांनी सादर केला होता. त्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळीविरूद्ध मोक्कानुसार केलेली ही नववी कारवाई आहे.

उमेश मुकेश वाघमारे (वय- २४ टोळी प्रमुख), मंदार संजय खंडागळे (वय- २१) आदित्य लक्ष्मण बनसोडे ऊर्फ भुंडया (वय -१९) गणेश मारुती शिकदार (वय -१९) विनायक ऊर्फ नंदु सुनिल शिंदे (वय -२२) अशी कारवाई केलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलीस अभिलेखवरील सराईत गुंड उमेश वाघमारे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने खुन,खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदेशीर घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी वारंवार गुन्हे केले असल्याचे सिद्ध झाले आहे.

हा आरोपी सराईत गुन्हेगार विशाल सातपुते यांच्या वरदहस्त खाली करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्यावतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला. त्यानुसार टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...