आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील मांजरी बुद्रुकमध्ये तरुणाचा खून:किरकोळ वाद बेतला जीवावर, मित्रानेच केला मित्राचा घात, दोघांविरूद्ध गुन्हा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ वादातून दोघांनी मित्राच्या डोक्यात दांडक्याने आणि पाईपने मारहाण करून खून केल्याची घटना 5 ते 6 जून दरम्यानच्या कालावधीत मांजरी बुद्रूकमधील महादेवनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध हडपसर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडीलांनी दिली तक्रार

सागर गिरीधर दासमे (वय 27, रा. मांजरी बुद्रुक,पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गौरव कारकिले आणि राजू सोनावणे (दोघेही रा. महादेवनगर, मांजरी बुद्रुक,पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. लखन गिरीधर दासमे (वय 26) यांनी फिर्याद दिली आहे.

तिघेही करत होते रंगकाम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर, गौरव आणि राजू मित्र असून ते रंगकाम करतात. सोमवारी 6 जूनला किरकोळ कारणावरून गौरव आणि राजूची सागरसोबत वादावादी झाली. त्याच रागातून दोघांनी सागरच्या डोक्यात दांडक्यासह प्लास्टिक पाईपने मारहाण करून खून केला. त्यानंतर ते पसार झाले आहेत, अशी माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने यांनी दिली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून हडपसर पोलिस प्रकरणी तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...