आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइमनगरी:मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकावर मोबाइल चोरांचा कोयत्याने जीवघेणा हल्ला

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकावर मोबाइल चोरांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी घडलीय. यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी तीन चाेरटयांविराेधात चंदननगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी घडली घटना?

पाेलिसांकडे बबन कुंडलिक दहिफळे (वय ६०, रा. खराडी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर घटना चार सप्टेंबर राेजी खराडी परिसरात चाैधरी वस्ती येथे टस्कन साेसायटीच्या उत्तरेकडील गेटसमाेर घडली. तक्रारदार बबन दहिफळे हे सदर ठिकाणावरून माॅर्निंग वाॅककरिता माेबाइल उजव्या कानाला लावून बातम्या ऐकत चालले हाेते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून माेटारसायकलवर आलेल्या तीन अनाेळखी इसमांपैकी एकाने माेबाइल हिसकविण्याचा प्रयत्न केला. परंतु दहिफळे यांनी त्यास हिसका देवून ओढले. तेव्हा तिघेही चाेरटे माेटारसायकलसह रस्त्यावर खाली पडले.

मोबाइल हिसकावून पळ

दहिफळे यांनी माेबाइल हिसकविणाऱ्या इसमास पकडले. त्याला पाठीमागे घेवून जात असताना माेटारसायकल चालकाने लाेखंडी काेयत्याने त्यांच्या उजव्या हाताच्या पाेटरीवर लाेखंडी काेयत्याने वार करून जखमी केले. तसेच त्यांच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा माेबाइल हिसकावून मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसून पळ काढळा.

आरोपींचा शोध सुरू

घटनेची माहिती पाेलीसांना मिळताच, परिमंडळ चारचे पाेलीस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, चंदननगर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, पाेलिस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पाेलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. याप्रकरणी संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पाेलिस करत असून आरोपींचा शाेध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पाेलिस निरीक्षक (गुन्हे) एस कदम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...