आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा कसला राग?:भाई न म्हटल्यामुळे तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून मारण्याचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाई न म्हटल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी रोड मारल्याचा प्रकार 4 जानेवारीला रात्री 8.30 वाजता खडकीतील शिवाजी पुतळा चौकात घडला. याप्रकरणी 3 आरोपींविरोधात येरवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी (6 जानेवारीला) दिली.

याप्रकरणी संतोष पंडीत साळवे (वय-36,रा.येरवडा,पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार प्रफुल्ल सोनवणे (वय-30,रा.नवी पेठ,पुणे), संकेत मोरे (रा.येरवडा,पुणे), महेश सुरेश पवार व सोनू मोरे या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रफुल्ल सोनवणे हा पोलिसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

काय आहे घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष साळवे हे सदर ठिकाणावरुन जीम मधून व्यायाम करुन दुचाकी वरुन घरी जात होते. त्यावेळी त्यांना ओळखीचे तरुण दिसल्याने त्यांना पाहून ते थांबले व त्यांनी प्रफुल्ल यास ‘ काय पप्या काय चालले आहे’ अशी विचारणा केली. त्यावेळी संकेत मोरे याने तुला भाई बोलता येत नाही का, तु लय मोठा भाई झाला का’ असे म्हणत शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याचे उद्देशाने साळवे यांचे डोक्यात लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी करुन मोबाईल आरोपींनी फोडला. तसेच आजुबाजूचे लोक भांडणे सोडविण्यासाठी येत असताना, आरोपींनी लोखंडी रॉड हवेत फिरवुन लोकांना तुम्ही इथे थांबु नका याला आम्ही जिवंत सोडणार नाही असे म्हणून दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी पुढील तपास येरवडा पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...