आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:जात पडताळणी समितीच्या उपायुक्ताला लाच घेताना बेड्या; 1 लाख 90 हजार रुपयांची स्विकारली लाच, झडतीमध्ये 2 कोटी 81 लाखांचे घबाड जप्त

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच मागून, प्रत्यक्षात 1 लाख 90 हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उपायुक्ताला रंगेहाथ पकडले. त्याच्या घरझडतीमध्ये एसीबीने रोख रकमेसह 2 कोटी 81 लाखांचे गबाड जप्त केले आहे. नितीन चंद्रकांत ढगे (वय 40) असे या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्ताचे नाव आहे.

वानवडी येथील ढगे यांच्या निवासस्थानाजवळ शनिवारी रात्री रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नितीन ढगे हे उपायुक्त तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आहेत.

तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने 8 लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर 3 लाखांची मागणी केली होती. परंतु, तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात ढगे यांनी तडजोड करुन 2 लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या निवासस्थानाजवळ बोलाविले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना पकडण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान त्याच्या घरझडतीमध्ये एसीबीने 1 कोटी 28 लाखांची रोकड व मालमत्तांची कागदपत्रे असे मिळून 2 कोटी 81 लाखांचे घबाड जप्त केले आहे.

एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा, पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईनंतर ढगे याला रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या आवाजाचा नमुना घ्यावयाचा आहे. प्रमाणपत्र प्रकरणाची कागदपत्रे जप्त करायची आहेत. स्विकारलेल्या रकमेत अटक आरोपी व्यतिरिक्त इतर कोणत्या सहकार्‍याचा सभाग आहे का याचा तपास करायचा आहे.

आरोपीच्या घरझडतीमध्ये एक कोटी 28 लाखपेक्षा अधिक रक्कम सापडली असून ती रक्कम त्याच्याकडे कशी आली याचा तपास करायचा आहे. त्याने इतर व्यक्तीकडूनही लाच स्विकारली असल्याची शक्यता पाहता त्या दृष्टीने देखील तपास करण्यासाठी सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यांना विक्रमसिंह घोरपडे यांनी सहकार्य केले. ढगे याला सत्र न्यायालयाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

जातपडताळणीसाठी यापूर्वी घेतले 5 लाख

तक्रादारांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून देखील ढगे याने तक्रारदार यांच्या पत्नीचे प्रमाणपत्र दिलेले नाही. तक्रादारदार वेळोवेळी ढगे याला भेटले. त्यांनी नाईलाजास्तव सप्टेंबर 2021 मध्ये जातपडताळणीच्रूा कामाकरीता 5 लाख रूपये दिले होते. तरीही ढगेने त्यांना पडताळणी प्रमाणपत्र दिले नाही. 14 ऑक्टोबर रोजी तक्रारदार ढगे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटले. त्यांनी तक्रादारांकडे अजून तीन लाख रूपयांची मागणी केली.

मोपेडच्या डिक्की ठेवण्यास सांगितली रक्कम
तडजोडी अंती दोन लाख देण्याचे ठरले. त्यानंतर एसीबीकडे तक्रार केल्यानंतर ढगे याने त्याची दुचाकी वानवडी येथील केदारी पेट्रोलपंपाजवळ लावली. तसेच तसेच लाचेची ठरलेली रक्कम डिक्कीत ठेवण्यास सांगितले. याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने ढगे याला त्याच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याची ग्रे रंगाची मोपेड दुचाकी देखील जप्त केली.

बातम्या आणखी आहेत...