आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:बिट्स कॉइन, ब्लू पिक क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या आमिषाने दीड कोटींचा गंडा, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिटस कॉइन आणि ब्लू पिक क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे आमिष दाखवून आठ जणांची तब्बल एक कोटी 47 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे .

इमरान खान (वय -35 ,रा. खराडी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत डॉ.पराग श्रीरंग दिनकर (रा.मुलुंड, मुंबई) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मे 2022 पासून आतापर्यंत घडलेला आहे.

नक्की काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इमरान खान याने त्याच्या बिट्स कॉइन व ब्लू पिक कंपनी विमाननगर पुणे या कंपन्यांमध्ये ॲपचे माध्यमातून बिट्स कॉइन मध्ये पैसे गुंतवल्यास 12 महिन्यांमध्ये दुप्पट रक्कम व ब्लू पिक मध्ये पैसे गुंतवल्यास गुंतवणूक केलेल्या रकमेवर प्रत्येक महिन्याला 15 टक्के रक्कम 15 महिने मिळेल असा विश्वास तक्रारदार यांचा संपादित केला.

त्यानंतर स्कीम मध्ये तक्रारदार व इतर गुंतवणूकदार यांना त्यांच्या कंपनीच्या स्कीम मध्ये पैसे भरण्यास भाग पाडून, ते पैसे परत न करता तक्रारदार यांची 25 लाख रुपयांची तर त्यांच्यासह इतर आठ जणांची मिळून एकूण 47 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी तक्रारदार डॉ.पराग केमकर यांनी आरोपी विरोधात येरवडा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी इम्रान खान याच्यावर भारतीय दंड विधानसहिता कलम 406, 420, 566 नुसार गुन्हा दाखल केला आहे .याबाबतचा पुढील तपास येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस गायकवाड करत आहे.