आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:टीव्ही, चित्रपट पाहून मुलीच्या खुनाचा कट, पोलिसांनी केली अल्पवयीन मुलाला अटक

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करून विवस्त्रावस्थेत मृतदेह झाडाझुडुपांमध्ये टाकला होता

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील थोपटवाडी येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून (२४ जुलै) तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा अखेर तपास लागला असून नात्यातीलच अल्पवयीन मुलाने त्याला वाईट बोलते याच रागातून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. चाकण पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली आहे. सावधान इंडिया, क्राइम पेट्रोल अशा टीव्ही मालिका आणि गुन्हेगारी चित्रपट पाहून अल्पवयीन मुलीचा आरोपी मुलाने खुनाचा कट रचला होता हे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

भामा आसखेड परिसरात थोपटवडी येथे (२४ जुलै)च्या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करून विवस्त्रावस्थेत मृतदेह झाडाझुडुपांमध्ये टाकण्यात आला होता. चाकण पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करत असताना नात्यातीलच अल्पवयीन मुलाने त्याला नेहमीच वाईट बोलते याचा राग मनात धरून हत्या केल्याची कबुली दिली आहे. संबधित अल्पवयीन मुलगा हा भारुडामध्ये स्त्री भूमिका करत असल्याने ही मृत मुलगी त्याला त्यावरून हिजड्यासारखा काय वागतो, बोलतो अशी वाईट बोलत असे त्यामुळे अपमानित झाला होता.