आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातला नोकरच निघाला चोर:गुंगीचे औषध देऊन मालकाला केले बेशुद्ध; पुण्यात 24 लाखांचा ऐवज केला लंपास

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील मुंढवा भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील नाेकराने मालक व मालकीण यांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन घरात 24 लाख रुपयांचा डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

याप्रकरणी नाेकर नरेश शंकर साैदा (वय-22) याचेवर मुंढवा पोलिस ठाण्यात घरफाेडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आराेपी विराेधात प्रीती विपीन हून (वय-37,रा.प्रभादेवी, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार चार डिसेंबर राेजी घडला आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार प्रिती यांची आई वडील विपीन हे पुण्यातील मुंढवा परिसरात पिंपळे वस्ती येथे फाॅरेस्ट कॅसल साेसायटीत राहतात. त्यांच्याकडे नाेकर नरेश साैदा हा काम करत हाेता. चार डिसेंबर राेजी रात्रीच्या जेवणातून त्याने गुंगीचे औषध सदर दाेघांना दिले. त्यानंतर ते दाेघे बेशुध्द झाल्यानंतर त्याने घरातील लाेखंडी पत्र्याचे कपाट उघडून त्यातील 286 ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, हिऱ्यांचे दागिने व राेख रक्कम असा एकूण 24 लाख रुपयांचा मुद्देमाल चाेरी करुन नेला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल हाेऊन परिस्थितीची पाहणी केली. पसार झालेला नाेकर नरेश साैदा याचा पाेलीस शाेध घेत असून याबाबत पुढील तपास मुंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनरीक्षक एस काटे करत आहे.

भिशीत फसवणूक

पुण्यातील वानवडी परिसरात राहणाऱ्या दत्तु तिमन्ना तमनगाेळ (वय-52) यांनी जुलै 2017 ते 2019 पर्यंत दरमहा दहा हजार रुपये 24 नंबर असलेली लिलाव भिशीत सहभाग घेतला हाेता. अाराेपी दशरथ महादेव माेरे (वय-39,रा.हडपसर,पुणे) याने सदर लिलाव भिशी चालवून तक्रारदार यांचेकडून दाेन लाख 40 हजार रुपये राेख स्वरुपात स्विकारले हाेते. त्यातील 40 हजार रुपये दादासाहेब श्रीरंग माने यांचे मार्फतीने त्यांना परत करण्यात आले हाेते.

गुन्हा दाखल

भिशीत कमिशन म्हणून बाेलीच्या वरील रक्कम स्वत:चे फायद्यासाठी ठेवून लुबाडणुकीच्या व आर्थिक उद्देशाने तक्रारदार यांनी गुंतवणुक केलेली दाेन लाख रुपयांची रक्कम परत न करता त्यांची फसवणुक करण्यात आली आहे. याबाबतचा अर्ज चाैकशीवरुन दाखल झाल्याने विलंबाने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वानवडी पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...