आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात एका व्यावसायिकाने हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत थांबण्यासाठी आपल्या बायकोच्या आधारकार्डाचा दुरुपयोग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेल व्यवस्थापकाला ही माहिती मिळताच त्याने या दोघांविरोधात पुण्यातील हिंजेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुजरातमधील व्यावसायिक असून, त्याचे वय 41 वर्ष आहे. आरोपीविरोधात त्याच्या पत्नीने देखील गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव आरिफ अब्दुल मांजरा असे असून, तो सुरत येथील रहिवासी आहे. त्याने चंडीगढ येथून एका महिलेला पुण्यात आणले होते. त्यानंतर हे दोघेही पुण्यातील एका हॉटेलमध्ये खोटी माहिती देऊन थांबले होते. आरोपी आरिफचे लग्न 2005 साली झाल्याची माहिती मिळत आहे.
पतीच्या कारमध्ये बसवले जीपीएस आरोपी आरिफच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरिफच्या पत्नीने त्याच्या एसयूव्ही कारमध्ये एक जीपीएस मशिन बसवले होते. कारण तिला गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर शंका होती. त्यामुळे तिने आरिफच्या कारमध्ये एक जीपीएस मशिन बसवली होती. पोलिसांनी सांगितले की, नोव्हेंबर 2021 मध्ये आरिफने कामानिमित्त आपण चंडीगढला जात असल्याचे सांगितले होते, मात्र त्याच्या पत्नीने लोकेशन चेक केले असता, तो पुण्यात एका हॉटेलमध्ये आपल्या प्रेयसीसोबत होता.
CCTV द्वारे केली अटक
लोकशन पुण्यात दाखवल्यानंतर आरिफच्या पत्नीने हॉटेलमध्ये संपर्क केला असता, तिला कळाले की, तो पुण्यातच एका दुसऱ्या महिलेसोबत थांबलेला आहे. त्यानंतर आरिफच्या बायकोने थेट पुणे गाठले. तिथे तिने चौकशी केली असता, आरिफने दुसऱ्या महिलेचे चेकइन आपल्या बायकोच्या आयडीकार्डवर केले होते. पतीविरोधात पुरावा मिळाल्यानंतर पत्नीने हिंजवाड़ी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. पत्नीने आपल्या आयडीकार्डचा दुरुपयोग केल्याचा आरोप पत्नीवर लावला आहे. पोलिसांनी आरोपी आरिफला अटक केली आहे. मात्र त्याची प्रेयसी मात्र फरार झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.