आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:शाळेतील समुपदेशनात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याचे उघड, एका अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरी एकटी असल्याचा फायदा घेत दोन मुलांनी घरात येऊन 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार शाळेतील समुपदेशनात उघडकीस आलाय. याप्रकरणी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलासह दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो तसेच आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

राज रवी कोळी (वय -18, मूळ रा. सातारा )असे गुन्हा दाखल झालेले आरोपीचे नाव असून त्याच्यासह 16 वर्षाच्या बालकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.हा प्रकार 13 /11 /2022 रोजी मुलीच्या राहत्या घरी घडला आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राज कोळी व अल्पवयीन बालक हे पीडित मुलीच्या घरी येऊन, घरात कोणी नसताना आरोपी राज कोळी याने 15 वर्षीय मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतले. तसेच तिला मिठी मारली तर अल्पवयीन आरोपीने पीडित मुलगी व राज कोळी यांचा मिठी मारलेला फोटो काढून तो फोटो व्हायरल केला. म्हणून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीने शाळेत समुपदेशनावेळी समुपदेशकांना संबंधित प्रकार सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने विलंबाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

अश्लील इशारे केल्याने गुन्हा

कात्रज परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील एक सात वर्षाची मुलगी क्लासला जात असताना, तिला आरोपी मोहम्मद सदल समीर (वय -25, रा. कात्रज, पुणे) याने हातवारे करत खाण्याचा पाव देतो असे दाखवून घरात ये असा इशारा केला. त्यानंतर अश्लील चाळे केल्याने याप्रकरणी पीडित मुलीच्या 31 वर्षीय वडिलांनी आरोपी विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.