आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:दोरीने गळा आवळून मुलांचा आईकडून खून; पतीने दिली पत्नीविरोधात तक्रार,मुलांवरून दांपत्यात नेहमीच वाद

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काैटुंबिक वादातून मुलांना सतत वेगवेगळ्या गाेष्टींवरून मारहाण करणाऱ्या जन्मदात्या आईनेच रागाच्या भरात पोटचा मुलगा व मुलीचा दाेरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पाैड पाेलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी पाेलिसांनी आराेपी महिलेस अटक केली असून तिच्याविराेधात तिच्या पतीने पाेलिसांकडे फिर्याद दिली आहे. दरम्यान, या महिलेला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चंदा संजय साेलंकी (३ वर्षे ६ महिने) आणि मुलगा आनंद संजय साेलंकी (२ वर्षे) असे खून झालेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी पूना संजय साेलंकी (२४) या आराेपी महिलेस पाेलिसांनी अटक केली आहे. तिच्याविराेधात पती संजय जगन्नाथ साेलंकी (२५, रा. शिरवली, पुणे) याने पाेलिसांकडे तक्रार दिली आहे. साेलंकी कुटुंबीय मूळचे मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील राहणारे असून मजुरी कामासाठी ते पुणे शहराजवळील मुळशी तालुक्यात शिरवळी येथे स्थायिक झाले आहेत. शिरवली येथे एका लेबर कॅम्पवर ते राहत असताना पूना ही सातत्याने मुलांचा रागराग करून त्यांना मारझाेड करायची.

शुक्रवारी तिचा राग अनावर झाल्याने तिने मुलगी चंदा व मुलगा आनंद यांचा गळा दाेरीने आवळला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पूनाने दाेन्ही मुलांचे मृतदेह घराजवळील झुडपात टाकून ती पसार झाली. मुलांचे वडील कामावरून घरी आल्यानंतर त्यांना मुले व पत्नी दिसून न आल्याने त्यांनी शाेध घेतला असता त्यांना मुलांचे मृतदेह सापडले. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी सदर महिलेला अटक केली. दरम्यान , मृत मुलांचे वडील आणि आरोपी महिलेत मुलांवर नेहमी भांडणे व्हायचे, असेही पोलिसांनी सांगितले.