आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारु पिण्यासाठी साथीदाराने पैसे न दिल्याच्या रागातून एका तरुणाने मजूराच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून त्यास गंभीर जखमी करत त्याचा खून केल्याची बाब उघडकीस आली आहे.
पुचु मनधुवा मुरमु (वय-49, रा.मगरपट्टा,पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी संजय कुनु चौरासिया (वय-19, रा.मगरपट्टा, पुणे, मु.रा.उत्तरप्रदेश) यास पोलीसांनी अटक केल्याची माहिती मंगळवारी दिली आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात सद्दाम हुुसेन (वय-31,रा.मुंढवा,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
बांधकाम साईडवर राहत होते एकत्र
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पुचु मुरमु आणि आरोपी संचय चौरासिया हे दोघे मगरपट्टा परिसरातील अमनोरा मॉलच्या बाजूला असलेल्या कुमार बांधकाम यांच्या बांधकाम साईटवरील लेबर कॅम्प मध्ये राहतात. दोघे ही हुसेन यांच्याकडे मजुरीच्या कामास होते. संजय चौरासिया यास दारुचे व्यसन होते आणि तो सतत पुचु यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. सोमवारी मध्यरात्री संजय याने नेहमीप्रमाणे दारु पिण्यासाठी पुचु यांच्याकडे पैशाची मागणी केली. परंतु त्यांनी पैसे न दिल्याने रागातून संजय याने रागाच्या भरात जवळचे पडलेल्या लोखंडी रॉडने पुचु यांचे डोक्यात मारुन त्यांना जीवे ठार मारले. त्यानंतर तो पसार झाला होता. परंतु पोलीसांनी आरोपीचा शोध घेत त्यास जेरबंद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील करत आहे. ु
खूनाचा गुन्हा दाखल
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे हद्दीत १७ डिसेंबर रोजी एका तरुण जखमी अवस्थेत मिळून आला होता. त्यास ससुन रुग्णालयात पोलीसांनी उपचारासाठी दाखल केल्यानंतर, उपचारा दरम्यान त्याचा 19 डिसेंबर रोजी मृत्यु झाला आहे. प्रकाश निवृत्ती रेणुसे (वय-27,रा.कात्रज,पुणे) असे मयताचे नाव आहे. त्याच्या एमएलसीच्या कागदपत्रांवरुन कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणांसाठी त्यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने रॉडने व दगडांनी डोक्यात व मानेवर व हातापायावर मारहाण केली आहे असावी. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार अनिल प्रल्हाद भोसले (वय-४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसारल भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.