आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकलला कट मारल्याचा राग:तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न, 2 संशयितांवर गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माेटारसायकलला एका ओळखीच्या दुचाकीस्वार तरुणाने कट मारल्याचे रागातून दाेन तरुणांनी दुचाकीस्वार चालकावर काेयत्याने वार करुन त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी दाेन आराेपींवर हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.

राेहित गायकवाड व अंबाजी शिंदे (दाेघे रा.हडपसर,पुणे) या आराेपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अरफात रज्जाक लब्बै (वय-23,रा.हडपसर,पुणे) याने याबाबत आराेपी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरची घटना चार डिसेंबर राेजी रात्री सव्वाबारा वाजता इंदिरानगर वसाहत, म्हाडा काॅलनी रस्त्यावर घडली आहे. तक्रारदार व आराेपी हे एकमेकांचे ओळखीचे आहे. अरफात हा त्याचे ओळखीचे पाहुण्यांकडे जात असताना, गाेसावी वस्ती याठिकाणी त्याचे माेटारसायकलचा कट हा राेहित गायकवाड याचे माेटारसायकलला बसला. त्याचा राग मनात धरुन तक्रारदार हा परत आल्यावर त्याचा मित्र शाहरुख यास भेटण्यासाठी इंदिरानगर येथे थांबलेला असताना राेहित गायकवाड ने त्याच्या जवळ असलेल्या काेयत्याने अरफात याचेवर जीवे ठार मारण्याचे उद्देशाने वार करण्याचा प्रयत्न करुन आराेपी अंबाजी शिंगे याने अरफात याचा मित्र शाहरुख यास हाताने मारहाण केली. सदर घटनेची माहिती मिळताच, परिमंडळ पाचचे पोलिस उपआयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी करुन आराेपी तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस डांगे करत आहे.

पुर्ववैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार

साैरभ किशाेर गायकवाड या तरुणास तु का मारले हा पुर्वीचा राग मनात धरुन सनि संजय सपकाळ (वय-25,रा.काेरेगाव पार्क,पुणे) या तरुणास एका टाेळक्याने धारदार शस्त्राने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जबर जखमी करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी काेरेगाव पार्क पोलिस ठाण्यात चार आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश युवराज ओहाळ (22) सागर कल्याण माने (30) व रुपेश दिंगबर जगताप (22) या तीन आराेपींना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचा साथीदार ऋतिक घाडगे (20) हा फरार झाला असून त्याचा पोलिस शााेध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...