आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात बंद हाकमुळे डेक्कन परिसरातील प्रसिध्द सौदामिनी हॅन्डलुम साडी दुकानाचे मालकीण अनघा घैसास यांनी राजकीय कार्यकर्त्यांचा विरोध डावलुन दुकान बंद करण्यास विरोध करत स्वत:चे दुकान सुरू ठेवले होते.
याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांचे फेसबुक पोस्टवर अनेकांनी अश्लील टिप्पणी केली होती. याप्रकरणी पै.प्रतिकेश विर नावाव्य या फेसबुक अकाऊंट धारकावर डेक्कन पोलिसांनी भादवि कलम 509 व आयटी अॅक्ट 66(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केल्याची माहिती गुरुवारी दिली आहे.
याप्रकरणी अनघा घैसास (वय-55) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनघा घैसास यांचे त्यांच्या नावाने फेसबुक खाते आहे. 13 डिसेंबर राेजी पुणे बंद करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व महाविकास आघाडी असून हिंदु समाजातील जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम शरद पवार व महाविकास आघाडी यांनी मिळून केलेले आहे. असा पुणे बंदचा निषेध करुन आराेप केला हाेता. त्यामुळे पै प्रतिकेश विर या नावाच्या फेसबुक खाते वापरणाऱ्याने तक्रारदार यांनी लिहिलेल्या अर्टिकलवर 14 डिसेंबर राेजी अंत्यंत अश्लील अशा कमेंट केल्या.
तसेच त्यांच्या दुकानावर बहिष्कार घालऱ्याचे आव्हान करत शिवीगाळ करत बदनामी करण्याचे हेतून मजकूर लिहून स्त्री मनास लज्जा उत्पन्न करणाऱ्या कमेंटे केल्या आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीस अज्ञात आराेपीने फाेन करुन तिचे क्लायंट मनाेहजर मंजुनाथ राव यांनी ओटीपी सांगितला नसताना ही, आराेपीने इंटरनेट बँकिंगचा पासवर्डचा बदल करुन तिचे क्लायंट मनाेहर राव यांची एकूण चार लाख 74 हजार रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात माेबाईलधारकावर चतुश्रृंगी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.