आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पीकरवर कोणते गाणे लावायचे या वरून टोळक्यांमध्ये वाद सुरू होता. दरम्यान एका पोलिसाने मध्यस्ती केल्याने त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. खडकी परिसरातल्या शाळेसमोर रात्री 12.00 वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्याने 5 जणांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
सुमित सुभाष मिश्रा, रसल अॅल्वीस जाॅर्स, वृषभ अशाेक पिल्ले, निशांत संजय गायकवाड (23) व सिध्दार्थ महादेव लाेहान (24) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे.
पोलिसाला धमकावले
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अर्जुन समरत बेदगुडे यांनी खडकी पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक बेदगुडे हे सदर परिसरात रात्रगस्त घालत हाेते. त्यावेळी संबंधित ठिकाणी आराेपी गैरकायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक ठिकाणी स्पिकरवर गाणे लावून नाचत हाेते. स्पिकरवर काेणते गाणे लावयाचे याकारणावरुन मुले आपआपसात भांडणे करत असल्याचे निसल्याने त्यांनी सदर मुलांना स्पिकर बंद करा असे सांगितले असता, मुलांनी त्याकडे दुर्लक्ष करुन आमचा स्पिकर तु बंद केला? अशी अरेरावीची भाषा वापरुन त्यांचे अंगावर धावुन येवुन चालक पाेलीस शिपाई जाधव याचे सरकारी गणवेशाची काॅलर पकडून आम्ही इथले काेण आहेत तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पोलिस असलास तरी आमचे काही वाकडे करणार असे म्हणून धमकावले.
कामामध्ये अडथळा निर्माण केला
माेठमाेठयाने तक्रारदार व पाेलीस चालक जाधव यांना शिवीगाळ पोलिसाच्या गाडीची चावी घेऊन त्यांच्या कामामध्ये अडथळ निर्माण केला. या झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांना 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस मगदुम करत अहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.