आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील माजी नगरसेवकांच्या भावाला धमकी प्रकरण:बनावट पोलिस अधिकारी असल्याचे सांगून खंडणी मागणारा भामटा जेरबंद

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे कॅन्टोन्मेंटचे माजी नगरसेवक विवेक यादव यांच्यावर पूर्वी दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने, त्यांच्या भावास एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर फोन करून 'मी एसीपी कदम मुंबई येथून बोलतोय ' असे भासवून त्यांच्याकडे पूर्वी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 15 ते 20 लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन बनावट पोलिस अधिकारी असणाऱ्या भामट्यास जेरबंद केल्याची माहिती शनिवारी दिली आहे.

अमित जगन्नाथ कांबळे (रा. नवी पेठ ,पुणे )असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लष्कर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक करत असताना पोलिस अंमलदार मोहसीन शेख व पुष्पेन्द्र चव्हाण यांना तांत्रिक विश्लेषण व आरोपीची बातमीदार मार्फत माहिती घेऊन, संबंधित गुन्ह्यातील आरोपीची गोपनीय माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ससून हॉस्पिटलच्या पाठीमागील राजीव गांधी रोड लगत हनुमान मंदिराजवळ आरोपी अमित कांबळे यास ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास लष्कर पोलिस स्टेशनच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले आहे. सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने पोलिस ,डॉक्टर असल्याची बतावणी करून पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 20 पेक्षा अधिक गुन्हे केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे ,पोलिस उपयुक्त अमोल झेंडे ,सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील , साहयक पोलिस निरीक्षक विशाल मोहिते, पोलिस अमलदार संजय जाधव, मोहसीन शेख ,निखिल जाधव ,पुष्पेन्द्र चव्हाण, उत्तम तारू, विनोद चव्हाण ,विजय पवार, नागनाथ राख, रेश्मा उकरंडे ,साधना ताम्हणे ,शंकर नेवसे ,नामदेव रेणुसे, उज्वल मोकाशी या पथकाने केलेली आहे.