आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी:पुण्यातील माजी नगरसेवकांच्या भावाला धमकी; पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत मागितले 15 ते 20 लाख

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोक्काच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या माजी नगरसेवकाचा विरोधातील उच्च न्यायालयातील बेल रद्द करण्याकरीता पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून नगरसेवकाच्या भावाकडे 15 ते 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारक आरोपी विरोधात लष्कर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,याबाबत गणेश अरुण भुरेवार (वय- 37 वर्ष, रा. कॅम्प, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.गणेश भुरेवार यांचा होर्डिंगचा व्यवसाय आहे. तीन एप्रिल रोजी अज्ञात आरोपीने लष्कर पोलीस ठाणे येथे लँडलाईनवर फोन करून माजी नगरसेवक विवेक यादव यांचा मोबाईल क्रमांक हायकोर्टाच्या कामी एसीपी कदम साहेब मागत आहे असे सांगितले. त्यानुसार लष्कर पोलीस ठाण्यातून गणेश भूरेवार यांचा नंबर आरोपीने घेतला.

त्यानंतर भुरेवार यांना आरोपींनी फोन करून सांगितले की, ' मी एसीपी कदम कोंढवा पोलिस स्टेशन येथून बोलतोय , मुंबई उच्च न्यायालयात विवेक यादव यांच्या विरोधात बेल कॅन्सलेशन रद्द करण्याकरीता रिव्हीजन दाखल केलेली आहे. तुमचा वकील अनिकेत निकम शुक्रवारी न्यायालयात हजर राहिला नाही. त्यामुळे आज बेल रद्दची ऑर्डर निघणार आहे.

आज तुझ्या भावाची काही खैर नाही. माझे विवेक यादवशी लगेच बोलणे करून दे. तुम्ही मोक्का गुन्ह्या मध्ये 70 ते 80 लाख खर्च केले आहे, हे मला माहिती आहे. तुझ्याकडे 30 मिनिट आहेत, जे काय असेल ते 15 ते 20 लाख ते काय तुम्हाला जड नाही अशा प्रकारे पैशाची मागणी केली. त्यानंतर एसीपी कदम नावाचा व्यक्ती वारंवार फोन करून विवेक यादव यास आज अटक केल्याशिवाय राहत नाही, पैसे दे अशी मागणी सातत्याने करू लागला. त्याचप्रमाणे पैसे न दिल्यास अटक करू मग खर्च करत बसा असे सांगून धमकी देत असल्याने भूरेवर यांनी फोन बंद करून चौकशी केली असता, कोंढवा मध्ये एसीपी कदम नावाचे व्यक्ती कोणी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी याबाबत लष्कर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सह्याक पोलिस निरीक्षक एस.गायकवाड पुढील तपास करत आहे.