आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील धनकवडी परिसरात राहणाऱ्या एका 32 वर्षीय विवाहितेचा मैत्रिणीसाेबत इन्स्टाग्रामवर फाेटाे एडीट करुन टाकून त्यावर ‘एक साथ दाे दाे ऑफर क्लाेज सुन’ असा मजकुर लिहून बदनामी केल्या प्रकरणी शिखा देशमुख नावाचे इन्स्टाग्राम खात्याचे तरुणीवर सहकारनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी बुधवारी दिली आहे.
याबाबत पिडित 32 वर्षीय महिलेने पाेलिसांकडे आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार 25/10/2022 ते 27/11/2022 यादरम्यान इंटरनेटद्वारे घडलेला आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सदर आराेपी शिखा देशमुख हिने ‘फाॅरेवर-हुसवी’ नावाने इनस्टाग्रामवर खाते ओपन केले. त्यानंतर तक्रारदार व त्यांची मैत्रिण यांचा फाेटाे एटीट करुन त्यावर ‘एक साथ दाे दाे ऑफर क्लाेज सुन’ असे लिहून ताे मेसेज व माॅर्फिंग फाेटाे शेअर केला. त्यावर तक्रारदार यांचा माेबाईल क्रमांक शेअर करुन अश्लिल मेसेज करुन धमकीचे व्हाॅटसअॅपला स्टेटस ठेवून पिडितेचे पती व छाेटया मुलीस मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रार अर्ज पाेलिसांकडे आल्यानंतर त्याची चाैकशी करुन आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक (गुन्हे) एस पासलकर करत आहे.
ऑनलाइन बदनामी प्रकरणी सासूची जावई विराेधात तक्रार
एका जावयाने सासूला तिच्या प्रेमविवाह केलेल्या लहान मुलीचे व्हाॅटसअपवर माॅर्फिंग केलेले फाेटाे व अश्लील व्हाॅईस रेकाॅर्डिंग पाठवुन सदरचे रेकाॅर्डिंगमध्ये अश्लील शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलीचे आक्षेपार्ह फोटो आणि रेकॉर्डिंग सोशल मिडीयावर प्रसारित केल्याने सासूने थेट पोलिस ठाणे गाठत दोषी जावई विरोधात पोलिसांकडे दाद मागितली. याप्रकरणी 48 वर्षीय सासूने लाेणीकाळभाेर पाेलिस ठाण्यात जावई विराेधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाेलिसांनी पप्पु कांबळे (वय-32, रा.खराडी,पुणे) या आराेपी विराेधात विनयभंग व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास लाेणीकाळभाेर पाेलिस करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.