आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:10 डिलिव्हरी बॉयकडून डिलिव्हरी कंपनीला वीस लाख रुपयांचा गंडा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिओ मार्ट कंपनीकडून ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू ग्राहकांना पोहोच न करता त्या दुसऱ्याच ग्राहकांना विक्री करून दहा डिलिव्हरी बॉयनी तब्बल 20 लाख 70 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहा जणांवर वारजे पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

याबाबत विनोद तात्या राखे (वय- 27 ,रा. चिंबळी, पुणे )यांनी आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार महेश सोनवणे, मयूर कडू, प्रशांत कांबळे, आदित्य वाघमारे, अभिषेक साठे, अनंत करचे , ललित शिंदे, राज गुप्ता, महादेव कांबळे, सिद्धांत मराठे या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा प्रकार जानेवारी 2023 पासून मार्च 2023 पर्यंत शिवणे येथील दांगट इंडस्ट्रियल इस्टेट मधील अगरवाल गोडाऊन या ठिकाणी घडलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हे डिलिव्हरी प्लस या कंपनीमध्ये काम करतात. कंपनीकडून मागील तीन महिन्यात ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू ग्राहकांना पोहोच न करता, त्यांचा अपहर डिलिव्हरी बॉय यांनीच केला. संबंधित वस्तू त्यांनी दुसऱ्या ग्राहकांना विकल्या आणि त्याचे पैसे ऑफिसमध्ये जमा न करता एकूण 19 लाख 72 हजार रुपयांच्या वस्तू आणि रोख 98 हजार रुपये असा एकूण 20 लाख 70 हजार रुपये किमतीचा त्यांनी अपहार केलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दहा आरोपींवर भारतीय दंड विधानसहिता कलम 408, 420 ,504 ,506 ,34 नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.याबाबत वारजे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस जवळगी पुढील तपास करत आहे.