आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगणार्या एका सराईत आरोपीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे असा 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशाल ऊर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी (वय- 21 रा. माऊली पार्क, बकोरी रोड, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस पेट्रोलिंग करीत असताना एक सराईत आरोपी पिस्तूल घेउन बकोरी रस्ता परिसरात थांबल्याची माहिती पोलिस नाईक स्वप्निल जाधव यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांच्या पथकाने सराईत गुन्हेगार विशाल पंदी यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अंगझडतीत पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळून आली. ही कामगिरी अपर आयुक्त रंजन शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे, एसीपी किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक मारुती पाटील एपीआय गजानन जाधव, बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, अजित फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे, आशिष लोहार, मल्हारी सपुरे, सचिन चव्हाण यांनी केली आहे.
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून 67 हजारांचे दागिने चोरीला
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलेच्या बॅग मधील 67 हजारांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना 26 फेब्रुवारीला दुपारी चारच्या सुमारास येरवड्यातील अतुर भवनात घडली आहे. याप्रकरणी महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.फिर्यादी महिला 26 फेब्रुवारीला येरवड्यातील अतुर भवनात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. त्यावेळी त्यांनी स्वतःचे दागिने बॅगमध्ये ठेऊन भवनातील लेडीज रुममध्ये ठेवले होते. त्यावेळी चोरट्याने त्यांची दागिने ठेवलेली सॅक चोरुन नेली. काही वेळानंतर महिला घरी जायला निघाली असता, त्यांना सॅक मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी येरवडा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.