आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:दहावी, बारावीचे बनावट सर्टिफिकेट बनवल्याने सांगलीच्या एकास अटक, पुणे गुन्हे शाखेची कारवाई

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाचवी नापास असतानाही त्याचे दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे बनावट गुणपत्रीका तयार केल्याप्रकरणी पुणे शाखेच्या पथकाने सांगलीच्या एका तरुणाला अटक केली आहे.

संदीप ज्ञानदेव कांबळे (वय -37, रा. मुक्काम पोस्ट दुधारी, पोस्ट टाकरी, जिल्हा सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात पोलिसा आमलदार राहुल बाळासो होळकर (वय - 31) यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

नक्की काय घडले?

ही घटना 8 फेब्रुवारी ते 30 /4 /2023 दरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपी संदीप कांबळे याने 60 हजार रुपयांच्या मोबदल्यात बनावट ग्राहक विकी रणजीत कांबळे( राहणार भवानी पेठ, पुणे) याला तो पाचवी नापास असल्याचे माहिती असून देखील, कोरोना काळानंतर वेगवेगळ्या खात्यांमध्ये निघालेल्या नोकर भरती करता त्याला दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्राची आवश्यकता होती.

त्यामुळे त्याच्या नावाचे महाराष्ट्र राज्य ओपन स्कूलचे दहावीचे स्टेटमेंट ऑफ मार्क्सचे प्रमाणपत्र व असेंट सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूलचे मूळ ट्रान्सफर सर्टिफिकेट बनावट तयार करून आरोपीने आणून दिले. याबाबतची माहिती उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी संदीप कांबळे याचा शोध घेऊन त्यास अटक केली आहे.

तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस अमलदार राहुल होळकर यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर हे करत आहेत.