आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातरुणीचे बनावट लग्न प्रमाणपत्र बनवत फसवणूक करणाऱ्या भामट्यास पुणे पोलिसांनी बुलढाण्यातून अटक केली आहे.
शेख खलील शेख जमील (वय-३० अमदापुर, ता-चिखली, बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नक्की प्रकरण काय?
आरोपी शेख जमीलने तरुणीच्या नावाचे बनावाट लग्नप्रमाणपत्र बनवत तो खरा असल्याचे भासवले. मुस्लीम समाजामध्ये तक्रारदार तरुणीची बदनामी केली. याप्रकरणी २४ जुलै २०२२ मध्ये तरुणीने पोलिसांकडून तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून आरोपी वारंवार राहण्याचे ठिकाण आणि मोबाईल क्रमांक वारंवार बदलून राहत होता.
सदर दाखल गुन्हयामध्ये आरोपी इम्रान शेख याला पोलिसांनी अटक केली होती. त्याचा साथीदार शेख खलील शेख जमील हा मागील नऊ महिन्यापासुन पसार झाला होता. तो जालना, बुलढाण्यात असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, सचिन रणदिवे, नामदेव गडदरे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही कामगिरी उपायुक्त शशीकांत बोराटे, एसीपी किशोर जाधव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, नामदेव गडदरे, सचिन रणदिवे, संतोष लवटे यांनी केली.
धमकावून उकळले २१ हजार रुपये
पुणे-सातारा रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात काम करत असलेल्या डाॅक्टर महिलेला धमकावून सायबर चोरट्यांनी तिच्याकडून २१ हजार रुपये बळजरीने उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका डाॅक्टर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी डाॅक्टर महिला खासगी रुग्णालयातील शिशू अतिदक्षता विभागात नियुक्तीस आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एका तरुणीने संपर्क साधला. तरुणीने फोटो मोर्फ करून डाॅक्टर महिलेची अश्लील चित्रफित पाठविली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी स्क्रीनशाॅट काढून डाॅक्टर महिलेला पाठविले.सोशल मीडियात सदर फोटो टाकून तिची बदनामी करेल असे सांगून तिची २१ हजार रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.