आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात वडील - मुलीच्या नात्याला काळिमा:सख्ख्या बापाकडून स्व:च्याच मुलीला विनयभंग; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना पुण्यात उघडकीस आली असून पित्याकडूनच स्वत:च्या 14 वर्षीय मुलीस घरात विवस्त्र करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पिडित मुलीने डेक्कन पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी 48 वर्षीय पित्यास अटक केल्याची माहिती गुरुवारी दिली आहे.

सदरचा प्रकार 29 डिसेंबर 2022 पूर्वी एक ते दाेन वेळा पिडित मुलीच्या राहते घरी घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी ही कुटुंबियासह डेक्कन परिसरात रहाण्यास आहे. घटनेच्या दिवशी घरातील सर्वजण झाेपलेले असताना, रात्री अंधारात पीडितेला वडीलांनी झाेपेतून उठवले. त्यानंतर आवाज न करण्यासाठी याकरिता तिचे ताेंड दाबुन तिला ऑफीसच्या वरच्या खाेलीत नेऊन त्याठिकाणी दरवाजा बंद करुन लाईट लावुन स्वत: वडील विवस्त्र हाेऊन त्यांनी मुलीचे अंगावरील सर्व कपडे काढून तिला विवस्त्र करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले.

हा घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर, याबाबत पीडितेने वडीलां विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आराेपी वडिलांवर विनयभंग व पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. याबाबत पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहे.

अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार

घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस स्वत:चे जीवाला बरेवाईट करण्याची धमकी देऊन तिला कायदेशीर पालकांच्या ताब्यातून पालकांचे संमती शिवाय तरुणाने त्याच्या माेटारसायकलवर पळवुन नेऊन मे 2022 पासून आतापर्यंत बाेपदेव घाटातील एका लार्जवर 7-8 वेळा नेऊन तिच्याशी वारंवार जबरी शारिरिक संबंध प्रस्थापित करत, अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या 35 वर्षीय आईने भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आराेपीस अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...