आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरतेचा कळस:42 वर्षीय वडिलांचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर, पोलिसांकडून नराधमास अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलांच्या आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. वडिलांनी स्वतःच्या 15 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून, तिला गरोदर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम वडिलांना अटक केली आहे, अशी माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली आहे.

याबाबत चंदन नगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात चंदननगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एम के मुळीक यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना जून 2022 पासून आतापर्यंत घडलेली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

घरी कोणी नसल्याचे पाहून..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही तिच्या राहत्या घरी असताना तिच्या वडिलांनी घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही, तसेच तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी असताना सुद्धा तिच्या अल्पवयीनपणाचा गैरफायदा घेतला. तिला राहत्या घरात जवळ घेऊन तिच्याशी शारीरिक जवळीक साधून, जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच लातूर जिल्ह्यातील गावावरून पुण्यात आल्यानंतर देखील त्यांनी तिच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

गरोदर असल्याचे निष्पन्न

चार एप्रिल रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी ससून रुग्णालय येथे आणण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी पीडित मुलीच्या नराधम वडिलांना अटक करण्यात आली आहे. याबाबत चंदननगर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक एस काळे पुढील तपास करत आहे.

संबंधित वृत्त

अनैतिक संबंधावरुन वाद:पुण्यात महिलेसह तिच्या 4 व 6 वर्षांच्या मुलांचा गळा दाबून खून, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळले

पुणे शहरातील कोंढवाचा सविस्तर